Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेठ बीड भागाचा पाण्याचा दुष्काळ संपणार !

येत्या चार दिवसात पाणीपुरवठा सुरू होणार

बीड प्रतिनिधी - बीड शहरातील पेठ बीड भागात पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर होती. अमृत पाणी पुरवठा योजनेतून सातत्याने पाठपुरावा करून आ.संदीप

पेठ बीड भागाचा पाण्याचा दुष्काळ संपणार !
अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा
बीड आणि शिरूर तालुक्यात परत आसमानी संकट

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील पेठ बीड भागात पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर होती. अमृत पाणी पुरवठा योजनेतून सातत्याने पाठपुरावा करून आ.संदीप क्षीरसागर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी पेठ बीड भागासाठी उपलब्ध केला.
काल नाळवंडी नाका येथील पाण्याच्या टाकीची पाहणी करून पाईपलाईन संदर्भात येत असलेल्या अडचणी तत्काळ दुरुस्ती करून आ.संदीप क्षीरसागर फायनल टेस्टिंग केली असून येत्या चार दिवसात बीड भागातील शास्त्रीनगर, मोमीनपुरा, बार्शी नाका, कंकालेश्वर मंदिर परिसर, अशोकनगर, हिरालाल चौक आदी भागांना यामुळे फायदा होणार असून या भागाची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार असून या भागाचा पाण्याचा दुष्काळ संपला असून येथे तीन ते चार दिवसात या भागात स्वच्छ पाणीपुरवठा होईल. तसेच चांदणी चौक कंकालेश्वर मंदिर परिसरातील पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून दोन ते तीन दिवसात ते काम पूर्ण होणार आहे. असे आश्वासन आमदार संदीप क्षीरसागर यांनी याप्रसंगी उपस्थित असलेल्या परिसरातील शेकडो नागरिकांना दिले.

COMMENTS