संगमनेर ः दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे हे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पूर्ण केले आहे. त्यांच

संगमनेर ः दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे हे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पूर्ण केले आहे. त्यांच्या सततच्या कामातून आणि पाठपुराव्यातून निळवंडेचे पाणी दुष्काळी भागातील शेतकर्यांपर्यंत आले असून हे पाणी सर्वांना मिळेल असा विश्वास नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला असून सर्वांना पाणी मिळावे याकरता आवर्तन काळ वाढवून द्यावा अशी मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे. चिंचोली गुरव येथे डावा कालवा पाणी पाहणी व परिसरातील शेतकर्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, दूध संघाचे संचालक भारत मुंगसे, युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, सरपंच विलास सोनवणे, संजय सोनवणे, पप्पू गोडगे, मेजर महेंद्र सोनवणे, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, नामदेव कहांडळ, संदेश गोडगे, संपत सोनवणे, विजय गोडगे, विलास मास्तर सोनवणे, गणेश सोनवणे सोमनाथ सोनवणे, रमण गोडगे, पोपट गोडगे, सोमनाथ आभाळे, पाटबंधारे जुनिअर अभियंता साबळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS