Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा व निळवंडेच्या आवर्तनातील पाण्याची नासाडी

देवळाली प्रवरा ः भंडारदरा व निळवंडे धरणातुन शेतीसाठी सुरु असलेले आवर्तन सुरु असून या आवर्तनातुन शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत भरणे झाले आहे.शेतकर्‍या

शिवसेना खा. राऊत यांच्या नावाने करणार दशक्रिया विधी
भगवान क्षीरसागर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
विकास पाहण्याची दृष्टी नसलेल्यांनी डोळ्यांच्या शिबीरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत :- सुनील गंगुले

देवळाली प्रवरा ः भंडारदरा व निळवंडे धरणातुन शेतीसाठी सुरु असलेले आवर्तन सुरु असून या आवर्तनातुन शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत भरणे झाले आहे.शेतकर्‍यांनी दोनदा भरणे करुन घेतले असल्याने सध्या शेतकरी पाणी घेण्यास तयार नसल्यामुळे पाण्याची तीव्र नासाडी होत आहे. ही नासाडी उन्हाळ्यामध्ये अतिशय धोकादायक आहे. पाटबंधारे विभागाने आढावा घेवून पाण्याची नासाडी थांबवावी शिल्लक पाण्यातुन मे व जुन  महिण्यात पुन्हा आवर्तन सोडून शेतकर्‍यांची पिके जगवता येतील.सध्याचे आवर्तन बंद करुन धरणातील पाणी वाचविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ञ प्रा.सतिश राऊत यांनी केली आहे.
                   भंडारदरा धरणाच्या आवर्तना बाबत प्रा.राऊत पञकारांशी बोलताना सांगितले की, भंडारदरा व निळवंडे धरणातुन 10 मार्च पासुन शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.गेल्या वीस दिवसा पासुन शेतीसाठी आवर्तन सुरु आहे.शेवटच्या शेतकर्‍यां पर्यंत दोनदा भरणे झाले असुन सध्या शेतकरी पाणी घेण्यास तयार नसल्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातुन सोडण्यात आलेले आवर्तन वाया जात आहे.पाण्याची नासाडी होत आहे.पाटबंधारे विभागाने आढावा घेवून पाण्याची नासाडी त्वरीत थांबवावी. सध्या सुरु असणारे आवर्तन बंद केल्यास वाचणारे पाणी मे व जुन महिण्यात आवर्तन सोडण्यात आले तर मे महिण्यातील  शेतकर्‍यांच्या पिकांना जीवदान देता येईल.सध्या सुरु असलेल्या आवर्तनातुन पाण्याची नासाडी होत आहे.मे महिण्यातील आवर्तनासाठी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे.राजकीय डाव साध्य करण्यासाठी मार्च महिण्यातील आवर्तनातुन धरण मोकळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.राजकीय डावात शेतकर्‍यांची मे मध्ये पिके जाळली गेली तर संबधितांना पाण्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. असे प्रा.राऊत यांनी सांगितले.

COMMENTS