Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा  

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबादला 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सात

अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगरात विनापरवानगी कँडल मार्च
मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबादला 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सात पथके तर दोन विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत.  शहरात परराज्यातून अवैद्य दारू वाहतूक तसेच विनापरवाना विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट रूम तर वाईन शॉप एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच बनावट मद्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी शासनमान्य दुकानातूनच मद्य खरेदी करावी असा अहवान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक संतोष झगडे यांनी केलाय. अवैध ठिकाणी दारू पिल्यास जीवितास हानी होऊ शकते अस पोलीस अधीक्षकांनी म्हटलय. तसेच अवैद्य धाबे किंवा दारू विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

COMMENTS