कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी-कान्हेगाव ग्रामस्थांची मागणी असलेली वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी-कान्हेगाव ग्रामस्थांची मागणी असलेली वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजना मागील काही वर्षापासून प्रलंबित असून अनेक वेळा परत गेलेल्या या वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा वर्षानुवर्षांपासूनचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे ३० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या इजिमा २ ते कान्हेगाव प्रजिमा ५ जोड रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणे व ३ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या सावळीविहीर, रुई, शिंगवे, वारी, गोधेगाव, शिरसगाव, सावळगाव रस्ता प्रजिमा १३ मध्ये वारी गाव ते कान्हेगाव गेट रस्ता काँक्रिटीकरण करणे व गटार बांधणेच्या कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, पिण्याचे, शेतीचे पाणी,रस्ते, वीजेचे प्रश्न, तीर्थक्षेत्र विकास व मुलभूत गरजांना प्राधान्य दिले आहे. रस्ते, पूल आणि पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुरी मिळवण्यात फार मोठा फरक आहे. पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवितांना अनेक बाबी तपासल्या जातात. यामध्ये पाणी पुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे का? ग्रामपंचायतीची स्वमालकीची जागा आहे का? पाण्याचा स्त्रोत आदी गोष्टी महत्वाच्या आहेत. तरीदेखील वारी-कान्हेगाव ग्रामस्थांची अनेक वर्षापासुनची विशेषत: माता, भगिनींची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजना या पंचवार्षिक मध्येच पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दोन वर्षात कोरोनाच्या महामारीत सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले त्याचा परिणाम विकास कामांवर झाला. माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील ऐतिहासिक काम करून कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे पूल बांधले. त्यामुळे त्याच्याकडून वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पूर्ण व्हावा हि अपेक्षा होती. त्यांनी या पुलाबाबत प्रस्ताव देखील मंजुरीसाठी पाठविले. परंतु दुर्दैवाने २०१४ ला सत्ता बदल झाल्यामुळे पुढील कार्यवाही झाली नाही. परंतु हा पूल देखील आपण पूर्ण करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. तसेच वारी-कान्हेगाव हा रस्ता अतिशय महत्वाचा असून कोळ नदीवरील पुलासाठी देखील निधी दिला आहे. २५१५ योजनेतून वारीच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला मंजुरी मिळाली असून या रस्त्याची देखील लवकरात लवकर निविदा प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. एमडीआर २०३ हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून या रस्त्यासाठी देखील निधी उपलब्ध होवून वारीचा दळणवळणाच्या अडचणी दूर होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, दिलीप बोरनारे, दिलीप आबक, बबनराव सांगळे, लक्ष्मणराव चौधरी, नामदेवराव जाधव, सरपंच सतिश काकडे, उपसरपंच विशाल गोर्डे, नानासाहेब टेके, देवचंद कडेकर, रंगनाथ काजळे, रमेश काजळे, व्यंकटराव जगताप, ताराचंद सत्राळकर, शरद जोशी, अशोक निळे, राजेंद्र गायकवाड, अशोकराव कानडे, गोरक्षनाथ टेके, रमेश कोकाटे, दत्तात्रय शिरसाठ, बाबूशेठ कलंत्री, भास्करराव आदमाने, संदीप जाधव, रमेश टेके, दिलीप देशमुख, दिलीप गायकवाड, रावसाहेब टेके, सचिन टेके, अशोक टेके, विजय गायकवाड, संजय जाधव, वाल्मीक काजळे, जनार्दन जगताप, प्रमोद सांगळे, बापू पडेकर, अनिल काजळे, प्रकाश चौधरी, दिनकर काजळे, दिपक भाकरे, कडूबा खिलारी, गणेश गुंजाळ, महेश भोकरे, विवेक टेके, गोपाल कारवा, सुखदेव मुसळे, राजेंद्र पांडे, गोरखज लांडगे, प्रकाश गोर्डे, मदनशेठ काबरा, पाळंदे सर, गोकुळ मेहेर, कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ गीते, येवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, पंचायत समिती उपअभियंता उत्तमर पवार, ग्रामसेवक वारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुलासाठी कुणी तरी निवेदन दिल्याचे ऐकायला मिळाले. मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना निवेदन द्यायची होती आणि पुलासाठी निधी देखील आणायचा होता. मात्र त्यावेळी निवेदन दिली नाही आणि निधी देखील आणला नाही. आता मात्र सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण सुचत असून आपण करणाऱ्या कामाबाबत निवेदन द्यायचे काम सध्या जोरात सुरु आहे – आ. आशुतोष काळे.
COMMENTS