नाशिक – वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने १ आणि २ डिसेंबर दरम्यान ठाणे येथे झालेल्या प्रतिष्ठित लक्ष्यवेध बिझनेस जत्रा २०२३ ची चमकदार
नाशिक – वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने १ आणि २ डिसेंबर दरम्यान ठाणे येथे झालेल्या प्रतिष्ठित लक्ष्यवेध बिझनेस जत्रा २०२३ ची चमकदार कामगिरीसह सांगता केली. क्विकशेफचे सह- आयोजन असलेल्या या कार्यक्रमात कंपनीची नाविन्य, शाश्वतता आणि खाद्यपदार्थ व पेय क्षेत्रात नव्या भागिदारी प्रस्थापित करण्याप्रती असलेली बांधिलकी दिसून आली.
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप अँड एक्सलन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस जत्राच्या माध्यमातून या क्षेत्रातील लीडर्स, उद्योजक आणि भागधारकांना एमएसएमई क्षेत्रातील चिकाटी व नाविन्याची दखल घेण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव यांनी या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘लक्ष्यवेध बिझनेस जत्रा २०२३ मधील आमचा सहभाग सुफळ ठरला. वेगवेगळे भागधारक, वितरक, रिटेलर्स आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय भागिदारांबरोबर संवाद साधण्याची संधी आम्हाला इथे मिळाली. इथे जाणवलेला उत्साह आणि मिळालेल्या प्रतिक्रियांवरून दर्जा व नाविन्याप्रती असलेली आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.’
कंपनीच्या ४३ आणि ४४ क्रमांकाच्या स्टॉल्सवर येणाऱ्या ग्राहकांचे विविध उत्पादनांच्या विस्तारण श्रेणीने लक्ष वेधून घेतले जात होते. त्यामध्ये क्विकशेफची रेडी-टु-इट मील्स, सॉसेस आणि मसाले तसेच स्नॅक बडीची होरेका श्रेणी यांचा त्यात समावेश होता. या प्रदर्शनादरम्यान ग्राहकांनी पदार्थांची चव घेण्यास भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना कंपनीची दर्जेदार उत्पादने उदा. आरईटी मील्स, सॉसेस आणि फ्रोझन पदार्थांचा आस्वाद घेण्याचा अनुभव मिळाला. त्यानिमित्ताने संभाव्य ग्राहकांना वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसच्या उत्पादनांचे वैविध्यपूर्ण स्वाद आणि उच्च दर्जा यांची अनुभूती घेता आली.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये केवळ दर्जेदार घटक साहित्य वापरले जात असल्याचे अधोरेखित केले. पदार्थांची चव घेण्यातून ग्राहकांना कंपनीच्या आंबटगोड सॉसेसपासून चविष्ट रेडी-टु-इट व फ्रोझन मील्सपर्यंतची विस्तृत श्रेणी, बारकाईने तयार करण्यात आलेली त्याची चव अनुभवता आली.
या कार्यक्रमातील कंपनीच्या दमदार अस्तित्वामुळे खाद्य क्षेत्रात नाविन्य व शाश्वतता आणण्याची बांधिलकी नव्याने दिसून आली. ताजे, स्थानिक पातळीवर मिळवण्यात आलेले घटक पदार्थ, पर्यावरणपूरक पॅकेजिंग यांवर भर देत वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस जबाबदारपणे खाद्य निर्मिती करण्याचे नवे मापदंड प्रस्थापित करत आहे आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी मार्ग तयार करत आहे.
लक्ष्यवेध बिझनेस जत्रा २०२३ मध्ये मिळालेले यश व सकारात्मक प्रतिसादामुळे वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसचे खाद्य व पेय क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे स्थान बळकट झाले आहे. यातून कंपनीची दर्जा, नाविन्य आणि या क्षेत्राअंतर्गत दीर्घकाळ टिकणारी भागिदारी तयार करण्याप्रती बांधिलकी दिसून आली आहे.
COMMENTS