Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वक्फ दुरुस्ती विधेयक अधिवेशनात मंजूर करावे : राज ठाकरे

मुंबई : लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. या शेतजमिनी तब्बल 103 शेतकर्‍यांच्या आहेत. अहमदपूर तालुक्यातील तळेगाव

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा
सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष | LOK News 24
Sangamner : टोल नाक्याच्या मनमानी कारभाराविरोधात संगमनेरकर एकवटले

मुंबई : लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. या शेतजमिनी तब्बल 103 शेतकर्‍यांच्या आहेत. अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातील 75 टक्के शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. यासंदर्भात गावातील 103 शेतकर्‍यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संसदेतील अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करावे असे आवाहन केले आहे.
यासंदर्भात बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, विरोधकांच्या कुठल्याची विरोधाला बळी न पडता संसदेच्या या अधिवेशनात वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मंजूर करावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले होते. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता. परंतु, मनसेच्या वतीने या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर पोस्ट करत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. तसेच सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगण्यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वत:चे राष्ट्रीयत्व दाखवून द्यावे, असे आवाहन वक्फ बोर्डाला केले आहे.

COMMENTS