Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान ; 9.7 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी संपली असून, आज बुधवारी विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानासा

राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच
टाकळी कडेवळीत डॉ. आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी
पोलिसांसमोर कपडे फाटेपर्यंत मारहाण
parivartan aghadi consists with various farmers union contest 288 seats in  legislative assembly poll

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी संपली असून, आज बुधवारी विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी जय्यत तयारी केली असून, आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणुकीला दोन्ही पक्ष सामोरे जातांना दिसून येत आहेत.
महायती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत असून, या निवडणुकीत देखील अनेक हायहोल्टेज लढती होतांना दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी प्रामुख्याने सहा पक्ष निवडणुकीत उभे असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिंदे यांची शिवसेना तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसचा समावेश आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँगे्रस, शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँगे्रस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा समावेश आहे. राज्यात सहा प्रमुख पक्ष निवडणुकीत असतांना, वंचित बहुजन आघाडी आणि मनसे स्वतंत्र निवडणूक लढतांना दिसून येत आहे. तर तिसरी आघाडीकडून देखील अनेक ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने 105, तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 44, तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. भाजप-शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते, पण युती तुटली. सर्व राजकीय गोंधळानंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र बहुमत चाचणीपूर्वीच 26 नोव्हेंबरला दोघांनाही राजीनामा द्यावा लागला. यानंतर 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सुमारे अडीच वर्षांनंतर शिवसेनेत, तर वर्षभरानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी होऊन दोन्ही पक्ष चार पक्षांत विभागले गेले. या राजकीय पार्श्‍वभूमीवरच लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना आघाडी मिळाली.

412 उमेदवारांविरूद्ध खून-बलात्कारासारखे गुन्हे
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण 4136 उमेदवार रिंगणात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने यापैकी 2201 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी करून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार जवळपास 29 टक्के म्हणजेच 629 उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यापैकी 412 जणांवर खून, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 50 उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप आहेत.

मतदानासाठी 2 लाख 21 हजार बॅलेट युनिटचा होणार वापर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 5 कोटी 22 हजार 739, तर महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतक्या आहेत, 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.

राज्यात 4.69 कोटी महिला मतदार
राज्यात 4,69,96,279 महिला मतदार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील मतदारांची संख्या 1,16,170 आहे.

राज्यात एकूण 4136 उमेदवार
राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण 4 हजार 136 उमेदवार आहेत. ज्यामध्ये 3,771 पुरूष, 363 महिला आणि तर अन्य 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

COMMENTS