Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद-पंचायत समितीत गुलालच उधळवणार : विवेक कोल्हे

कोपरगाव : राहाता तालुक्यातील वाकडी म्हटले की राजकीयदृष्ट्या अनेकांच्या छातीत धडकी भरवणारे गाव म्हणून त्याची ओळख आहे. कुठल्या दिशेला जावे, एकमताने कोणा

गौतम’च्या संगणक विभागाचा ‘सुनंदा इन्फोटेक’शी करार
ज्ञानज्योती सावित्रीबाईंचा त्याग मोठा : डॉ. ठाणगे
सुरेगाव गटाच्या अंगणवाडी सेविकाचा गोदाकाठ मध्ये सन्मान

कोपरगाव : राहाता तालुक्यातील वाकडी म्हटले की राजकीयदृष्ट्या अनेकांच्या छातीत धडकी भरवणारे गाव म्हणून त्याची ओळख आहे. कुठल्या दिशेला जावे, एकमताने कोणाचा कार्यक्रम लावायचा हे याच ठिकाणी ठरते. त्यामुळे हा नुसता सत्काराचा फेटा नसून, एक जबाबदारीची जाणीव वाकडी ग्रामस्थांनी नगरसेवकांना करून दिली आहे. पूर्वीपासून गणेश परिसराचे कोल्हे परिवारावर, तसेच स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांवर नितांत प्रेम राहिले आहे. हेच प्रेम तुम्ही भविष्यातही द्याल, असा विश्वास व्यक्त करतानाच   कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.

  कोपरगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेतेपदी प्रसाद आढाव तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा राहाता तालुक्यातील वाकडी येथील मारुती मंदिरामध्ये युवा नेते विवेक  कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

 कोल्हे म्हणाले, निश्चितपणाने वाकडी- पुणतांबा सहित गट व गण येत्या काळात आपल्याला ताब्यात घ्यायचे आहेत.यासाठी आपल्याला जोमाने कामाला लागायचे आहे. आपल्या सर्वांना ठरवायचे आहे की आपण गुलामी स्वीकारायची की गुलाल उधळायचा. म्हणून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण गुलालच स्वीकारणार, अशी मला खात्री आहे. श्री खंडेरायाचा भंडारा आपण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उधळणारच आहोत, असे प्रतिपादन युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी होते. याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, श्री गणेशचे चेअरमन सुधीर लहारे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय निवड विष्णुपंत शेळके यांनी केली. प्रास्ताविक शिवाजी तात्या लहारे यांनी केले. वाकडी सोसायटी, हायस्कूल व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत वाकडी, वाकडी सोसायटी, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे सर्व विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आभार बी. एल, आहेर यांनी मानले.

COMMENTS