नेवासाफाटा ः नेवासाफाटा जवळ असलेल्या कडा कॉलनी येथे महादेव पिंड, श्री दत्त विठ्ठल रुख्मिणी, गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी मध्यमेश्वर मंदि
नेवासाफाटा ः नेवासाफाटा जवळ असलेल्या कडा कॉलनी येथे महादेव पिंड, श्री दत्त विठ्ठल रुख्मिणी, गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज यांच्या हस्ते व ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आली. मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व महंत हभप उध्दवजी महाराज मंडलिक, महंत श्री सुनीलगिरीजी महाराज, महंत रमेशानंदगिरी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शुक्रवारी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषिनाथजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रय, महादेव पिंड, नंदी, विठ्ठल रुख्मिणी, गणपती यांच्या मूर्तीचे शास्त्रोक्त पध्दतीने पूजन करण्यात आले.
प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या प्रसंगी उपस्थित यजमानांच्या हस्ते आहुती टाकण्यात येऊन यज्ञ करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती आचार्य अंकुर देशपांडे गुरुजी जळगाव, वेदमूर्ती अनिरुद्ध पळसकर गुरुजी( संभाजीनगर), वेदमूर्ती अजय जोशी गुरुजी (जळगाव), वेदमूर्ती आदित्य कुलकर्णी गुरुजी (संभाजी नगर), महेश कुलकर्णी (जळगाव) संगीतकार रमेश शिरसागर (जळगाव) यांनी केले. यावेळी महंत ऋषिनाथजी महाराज व महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांचे संत पूजन करण्यात आले. यावेळी सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ, सोहळा कमिटीचे संभाजीराव मते, बन्सीभाऊ आगळे, दशरथराव मुंगसे, रामभाऊ पंडित, डॉ. अण्णासाहेब चव्हाण, अग्रवाल, लक्ष्मणराव गारुळे, पत्रकार बाळासाहेब देवखिळे, प्रदीप राजगिरे, अक्षय देवखिळे, दिलीप पुंड, रघुनाथ शिरसाठ, दीपक डमाळे, सुनील नागपूरे, चांगदेव शिंदे, पवन अग्रवाल, बाळासाहेब देवखिळे गणेश माटे अरविंद विखे, भाकचंद पाडळे, अॅड. रविंद्र सारंगधर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचदिवशी सांयकाळी 6 ते 8 यावेळेत त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन झाले. तद्नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाची सांगता करण्यात आली.
COMMENTS