कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणार्या ब्राम्हणगाव आरोग्य उपकेंद्रास रोजी आरोग्य मंत्रालय भारत सरकारचे

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणार्या ब्राम्हणगाव आरोग्य उपकेंद्रास रोजी आरोग्य मंत्रालय भारत सरकारचे मुख्य सचिव अपूर्वा चंद्रा यांनी भेट देऊन तेथे आरोग्य मंत्रालया अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनां ग्रामपातळीवर कशा पद्धतीने राबविल्या जातात याची व परिसर स्वच्छता तसेच उपकेंद्र इमारत अंतर्गत स्वच्छतेची पहाणी करत उपकेंद्रांतर्गत सुरू असलेली ऑनलाइन कामे म्हणजेच एनसीडी पोर्टल, आरसीएस पोर्टल, एच.आय.एम.आय.एस.,आय.डी.एस.पी या संदर्भात लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ बरोबर आहेत का (ऑफलाइन तसेच ऑनलाईन)याची माहिती घेतली तसेच कामकाज सुधारणे बाबत उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केले.
या उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी संकेत पोटे यांनी उपकेंद्र अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली विशेष म्हणजे उपस्थित आरोग्य सेविका सरिता मैद आर सी एच अंतर्गत सुरू असलेल्या कामाची विस्तृतपणे माहिती दिली तसेच सरांनी उपस्थित आशा सेविका समवेत त्यांच्या कामा संबंधी चर्चा केली. ब्राह्मणगाव सारख्या ग्रामीण भागात आरोग्य मंत्रालया अंतर्गत सुरू असलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे हे पाहून सरांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ बाविस्कर, कुटुंब कल्याण पुणे चे उपसंचालक डॉ गोविंद चौधरी उपसंचालक नाशिक विभाग डॉ कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास घोलप, डॉ अनिकेत खोत, डॉ पठाण, समुदाय आरोग्य अधिकारी संकेत पोटे, आरोग्य सेवक शामराव गावडे तसेच उपकेंद्रांतर्गत येणार्या आरोग्य सेविका सर्व आशा सेविका यावेळी उपस्थित होत्या.
COMMENTS