Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार

अतिरेक्यांनी पोलिस चौकीसह अनेक घरे जाळली

इम्फाळ ः लोकसभा निवडणुनंतरही मणिपूर शांत झालेले नाही. मणिपूरमधील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, अतिरेक्यांनी पुन्हा एकदा पोलिस चौकीसह अनेक

आ.धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शहराध्यक्षपदी सय्यद फेरोज यांची निवड
पुरंदरेंचे उदात्तीकरणातून छत्रपतींचा अपमान, मावळा कसा खपवून घेतो ?

इम्फाळ ः लोकसभा निवडणुनंतरही मणिपूर शांत झालेले नाही. मणिपूरमधील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, अतिरेक्यांनी पुन्हा एकदा पोलिस चौकीसह अनेक घरे जाळली आहेत. त्यामुळे मणिपूरला पुन्हा एकदा धुमसतांना दिसून येत आहे. अतिरेक्यांनी येथील जिरीबाम जिल्ह्यात एका पोलिस चौकीवर आणि काही घरांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिस चौकी आणि काही घरांना आग लावली. या घटनेनंतर जिरीबाम जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट झाले असून या परिसरातील तब्बल 200 पेक्षा जास्त लोकांना मदत करत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.
राजधानी इंफाळपासून तब्बल 220 किमी अंतरावर असलेल्या लामता खुनो, मोधूपूर भागातही हल्ले झाले आहेत. यानंतर मणिपूर पोलिसांच्या कमांडो तुकडीला शनिवारी सकाळी इम्फाळहून जिरीबाम येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. दरम्यान, येथील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अंगोमचा बिमोल अकोइजाम यांनी राज्य सरकारला जिरीबाम जिल्ह्यातील लोकांच्या जिवाचे रक्षण करण्याची विनंती केली. अकोइजाम माध्यमांशी बोलतांना म्हणाले, मी जिरीबामच्या जिल्हा अधिकार्‍यांशी बोललो आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे की त्या ठिकाणी पोलिस पोहचले असून शहरातील लोकांना सुरक्षा पुरवली जात आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी मैतेई वृद्धाच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार झाला. 59 वर्षीय सोइबाम सरतकुमार सिंग असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी तो आपल्या शेताकडे निघाला होता, नंतर त्याचा मृतदेह आढळून आला, ज्यावर धारदार शस्त्राने जखमा केलेल्या होत्या. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जिरीबाम पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करत निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडून घेतलेली परवानाधारक शस्त्रे त्यांना परत करावीत, अशी मागणी केली. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मणिपूर पोलिसांनी इंफाळमध्ये उपस्थित असलेल्या राज्य पोलिस कमांडो अधिकार्‍यांना शनिवारी जिरीबामला पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. हिंसाचारामुळे 200 हून अधिक मैतेई लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. जिरी क्रीडा संकुलात आता अनेक गावकरी राहत आहेत. अहवालानुसार, जिरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये राहणार्‍या लोकांची गावातील घरे अतिरेक्यांनी जाळली. मैतेई समाजातील वृद्धाची हत्या आणि लोकांच्या घरांना आग लावण्यामागे कुकी अतिरेक्यांचे नाव पुढे येत आहे.

COMMENTS