Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच

शाळेबाहेर महिलेची गोळ्या झाडून हत्या

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार काही थांबण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी मणिपूरमध्ये शाळेच्या बाहेर

आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना दिलासा
महाविकास आघाडी संघर्षात; तर, वंचित अस्तित्वाच्या लढ्यात !
आजचे राशीचक्र शनिवार,०४ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार काही थांबण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी मणिपूरमध्ये शाळेच्या बाहेर एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इंफाळच्या पश्‍चिम जिल्ह्यामध्ये एका शाळेबाहेर महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही अज्ञातांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. शाळेच्या बाहेर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इंफाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ही महिला शिशु निकेतन शाळेच्या बाहेर उभी होती. त्याच वेळी त्याठिकाणी आलेल्या अज्ञात तरुणांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. महिलेची हत्या करुन आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद होत्या. आता शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्याच्या एका दिवसानंतर शाळेच्या बाहेरच एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

COMMENTS