Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला

इम्फाळ ः मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. लष्कर आणि आसाम रायफल्सची दोन तास चकमक झाली. यावेळी कुकी अतिरेक्यांकडू

लोणंदमध्ये तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; आरोग्य विभागालाच सलाईनसह इंजेक्शनची गरज
सहायक कामगार आयुक्ताला ’सीबीआय’कडून अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटक ; गुन्हा दाखल

इम्फाळ ः मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. लष्कर आणि आसाम रायफल्सची दोन तास चकमक झाली. यावेळी कुकी अतिरेक्यांकडून 75 मैतेई महिलांची सुटका करण्यात आली आहे. कांगपोकपी जिल्ह्याच्या पायथ्याला असललेल्या बिष्णुपूर जिल्ह्यातील वारियोसिंग भागातील या महिल्या होत्या. रात्री या भागातून मैतेई महिलांचे कुकी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. आसाम रायफल्सने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये दोन सैनिक संशयित दहशतवाद्यांवर गोळीबार करताना दिसत आहेत.

COMMENTS