Homeताज्या बातम्यादेश

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसा; गोळीबारात ९ जणांचा मृत्यू

मणिपूर प्रतिनिधी - मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरा पासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तो

शिंदेंच्या जाहिरातींना फडणवीस समर्थकांचे नांदेडमध्ये प्रत्युत्तर
नगरची एमआयआरसी आता झाली रेजिमेंटऐवजी स्कूल
पिसाळलेल्या कुञ्याने चाव्यानेे आठ गायींसह शेळीचा मृत्यू

मणिपूर प्रतिनिधी – मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरा पासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तोच गोळीबाराच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री एका गावात मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला आहे. यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १० अन्य नागरिक जखमी झाले आहेत. सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकऱ्यांवर भ्याड हल्ला केला आहे. पहाटे १ वाजता हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. या सर्वांना इम्फाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आदिवासी बहुल भाग आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी देखील या भागात गोळीबार झाला होता. यामध्ये नऊ लोक जखमी झाले होते. फुटीरतावादी आणि ग्रामीणांमध्ये सोमवारी रात्री उशिरा गोळीबार झाला होता. दोन्ही बाजुचे नऊजण जखमी झाले होते. मणिपूरमध्ये गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 310 जण जखमी झाले आहेत. राज्यातील 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

COMMENTS