Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद नरसाळे यांची निवड

तलवाडा प्रतिनिधी - पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणार्‍या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेची मराठवाडा स्तरीय अधिवेशनात जिल्हा कार्यकारिणी जाहीर क

रस्त्याच उद्घाटन फटाके फोडत गुत्तेदारांनी केला स्वतःचा मोठेपणा
पोलिसाने पोलिसावरच चालवली बंदूक… थोडक्यात टाळला अनर्थ…
श्री स्वामीचे अनुभव | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav

तलवाडा प्रतिनिधी – पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणार्‍या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेची मराठवाडा स्तरीय अधिवेशनात जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेवराई येथील पत्रकार विनोद नरसाळे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीड येथील मराठवाडा अधिवेशनात व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीनंतर पत्रकार विनोद नरसाळे यांच्यावर अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनद्वारे सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
देशभरात व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान कौशल्य, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन या प्रश्नांकडे व्हॉईस ऑफ मीडियाने लक्ष केंद्रित केले असून पत्रकारांचा देखील मोठा प्रतिसाद व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेला मिळत आहे. दरम्यान रविवारी बीड येथे झालेल्या भव्य दिव्य अशा मराठवाडा अधिवेशनात अनेक पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये गेवराई येथील पत्रकार तथा दै.दिव्य मराठीचे गेवराई तालुका प्रतिनिधी विनोद नरसाळे यांची बीड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, टेलिव्हिजन विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील, राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार विनोद नरसाळे यांना या निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल व्हाईस व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रवक्ते गणेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष भागवत जाधव, जेष्ठ पत्रकार शिवाजीमामा ढाकणे, व्हॉईस ऑफ मीडियाचे गेवराई तालुकाध्यक्ष विनोद पौळ, सुनील मुंडे, राजेश राजगुरू, विष्णू गायकवाड, वैजिनाथ जाधव, मंगेश चोरमले, विनायक उबाळे, तुकाराम धस, कामराज चाळक, विवेक कचरे, बाळासाहेब घाडगे, गोपाल चव्हाण, आशिष कुलकर्णी, आबासाहेब पाटील, अतीख शेख, आर.आर.बहिर, अजहर इनामदार, त्रिंबक कोकाट, सचिन डोंगरे, आसेफ शेख, भागवत ढोरमारे, सतिश वाघमारे, मनोज शेंबडे,भिवराज मळक, यासीन शेख आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

COMMENTS