सातारा / प्रतिनिधी : सातारकरांची मान अभिमानाने उंचवणारी साहित्य क्षेत्रात आणखी एक निवड झाली असून, मराठी भाषा, साहित्याला जगात पोहोचवणार्या, दे

सातारा / प्रतिनिधी : सातारकरांची मान अभिमानाने उंचवणारी साहित्य क्षेत्रात आणखी एक निवड झाली असून, मराठी भाषा, साहित्याला जगात पोहोचवणार्या, देशातील सर्व साहित्य संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची निवड जाहीर झाली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी पुण्याचे प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाहपदी सौ. सुनीताराजे पवार यांची निवड झाली आहे.
ग्रंथ, साहित्य प्रसाराला चालना देण्यासाठी पुणे येथे सन 1878 मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. आजवर तब्बल 98 साहित्य संमेलने झाली असून, महाराष्ट्रासह देशभरात या संमेलनांनी मराठी भाषेतील साहित्याला समृध्द करण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच जगभरात तब्बल 7 विश्व साहित्य संमेलने भरवून मराठी भाषेचा डंका जगभर पोहोचविला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत कोषाध्यक्ष पदाची निवड आज, गुरुवार, दि. 10 रोजी पुण्यात झाली. यामध्ये विनोद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आले. ते सध्या राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष आहेत. ही दोन्हीही पदे सातार्याला विनोद कुलकर्णी यांच्या रुपाने प्रथमच मिळाली आहेत.
विनोद कुलकर्णी यांनी जनता सहकारी बँक, सातारा ही अडचणीतून बाहेर काढत भक्कम आर्थिक स्थितीत आणली आहे. ’छोट्या बँकेची मोठी गोष्ट’ हे जनता बँकेच्या वाटचालीवरील त्यांचे पुस्तक प्रसिध्द झाले आहेत. जनता बँकेच्या माध्यमातून अभ्यासिका सुरु करुन युवा पिढीला त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी मोलाची मदत केली आहे.
COMMENTS