Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खंबाळे गावात दारुबंदीचा गावकऱ्यांचा एकमुखाने निर्णय

मौजे खंबाळे - ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक येथे गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत गावातील नागरिकांनी  एकमुखाने निर्णय घेतला आहे . त्याबाबत ग्

भागवतराव शिंदे यांचे निधन
दुष्काळमुक्तीसाठी पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवणार ः मुख्यमंत्री शिंदे
नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन कुर्‍हाडीने फोडले

मौजे खंबाळे – ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक येथे गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत गावातील नागरिकांनी  एकमुखाने निर्णय घेतला आहे . त्याबाबत ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील महिलांच्या सह्यांनीशी मा. पोलीस निरीक्षक त्र्यंबकेश्वर यांना निवेदन देण्यात आले . अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली असून , नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याबाबत तसेच अनेक लहान मुलेदेखील व्यसनाधीनतेकडे वळत असल्याबाबतची  तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांनी मांडली. सदर प्रकरणी ठोस पावले उचलून गावातील अवैध दारूविक्री त्वरित बंद करण्याची मागणी पोलीस यंत्रणेकडे करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच भाऊसाहेब भोईर ,उपसरपंच ॲड. ज्ञानेश्वर मोरे  , ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गावात अवैध दारू विक्रीमुळे गावातील महिलांना त्याचा प्रचंड त्रास होत असून अनेक संसार मोडले आहे . नवीन पिढीदेखील व्यसनाकडे वळत आहे . यावर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.  

COMMENTS