Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र

श्रीगोंदा : आढळगाव येथे 548- डी राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली सुरू असलेल्या अर्धवट व धोकादायक कामांविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून,  उपोषण व जनआंदोलनाच्या तिसऱ्या  दिवशीही प्रशासकिय अधिकारी,आमदार, खासदारांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सरपंच शिवप्रसाद बंटी उबाळे यांच्या नेतृत्वाखाली एस.टी. स्टँडसमोरील छत्रपती शिवाजी महाराज ओटा येथे ग्रामस्थ एकवटले आहेत. प्रशासनाने तातडीने काम सुरू न केल्यास बेमुदत आढळगाव बंद आणि तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. गावातून जाणारा महामार्ग हा विकासाचे प्रतीक नसून गावाच्या अस्तित्वावर घाला ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महामार्गाच्या मध्यभागी उभे असलेले वीज पोल, अपूर्ण सर्विस रोड, अंधारात बुडालेला गावठाण परिसर आणि रखडलेली ड्रेनेज व्यवस्था यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या निखिल कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीवर निष्काळजीपणा व मनमानी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “काम अर्धवट सोडून ठेकेदार आणि प्रशासन दोघांनीही गावाकडे पाठ फिरवली आहे,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला. सरपंच शिवप्रसाद बंटी उबाळे यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले, “हा लढा माझ्या गावाच्या अस्तित्वाचा आणि माणसांच्या जीवनमानाचा आहे. आम्ही मागे हटणार नाही. प्रशासनाने तातडीने काम सुरू केले नाही, तर बेमुदत गावबंद करून तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.” त्यांच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्याने आढळगावचा निर्धार अधिकच पक्का झाला आहे. आता प्रशासन न्याय देणार की आढळगाव बंद आणि रस्ता रोको आंदोलनातून व्यवस्थेला जागे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Buldhana : शेतकऱ्यांना मोबदला न देता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु (Video)
लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग लातूर-आंबेजोगाई-केज-बीड मार्गेच व्हावा
Sangamner : संगमनेर शहरातील चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार (Video)

श्रीगोंदा : आढळगाव येथे 548- डी राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली सुरू असलेल्या अर्धवट व धोकादायक कामांविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून,  उपोषण व जनआंदोलनाच्या तिसऱ्या  दिवशीही प्रशासकिय अधिकारी,आमदार, खासदारांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

सरपंच शिवप्रसाद बंटी उबाळे यांच्या नेतृत्वाखाली एस.टी. स्टँडसमोरील छत्रपती शिवाजी महाराज ओटा येथे ग्रामस्थ एकवटले आहेत. प्रशासनाने तातडीने काम सुरू न केल्यास बेमुदत आढळगाव बंद आणि तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

गावातून जाणारा महामार्ग हा विकासाचे प्रतीक नसून गावाच्या अस्तित्वावर घाला ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महामार्गाच्या मध्यभागी उभे असलेले वीज पोल, अपूर्ण सर्विस रोड, अंधारात बुडालेला गावठाण परिसर आणि रखडलेली ड्रेनेज व्यवस्था यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या निखिल कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीवर निष्काळजीपणा व मनमानी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “काम अर्धवट सोडून ठेकेदार आणि प्रशासन दोघांनीही गावाकडे पाठ फिरवली आहे,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला.

सरपंच शिवप्रसाद बंटी उबाळे यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले, “हा लढा माझ्या गावाच्या अस्तित्वाचा आणि माणसांच्या जीवनमानाचा आहे. आम्ही मागे हटणार नाही. प्रशासनाने तातडीने काम सुरू केले नाही, तर बेमुदत गावबंद करून तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.” त्यांच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.

आंदोलनाचा तिसरा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्याने आढळगावचा निर्धार अधिकच पक्का झाला आहे. आता प्रशासन न्याय देणार की आढळगाव बंद आणि रस्ता रोको आंदोलनातून व्यवस्थेला जागे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS