Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विक्रमसिंह पाचपुते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे आमदार : रासकर

श्रीगोंदा : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निधीतून झालेल्या आढळगाव ते कोकणगाव रस्त्यचे  काम ठेकेदारांनी  अतिशय चांगले केले, परंतु काही कारणा

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू
आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
Displaying IMG-20250731-WA0024.jpg

श्रीगोंदा : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निधीतून झालेल्या आढळगाव ते कोकणगाव रस्त्यचे  काम ठेकेदारांनी  अतिशय चांगले केले, परंतु काही कारणास्तव साईट पट्ट्याचे काम रखडले होते स्थानिक प्रशासनकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही साईट पट्ट्या पूर्ण केल्या नव्हत्या. भाजपचे नेते सन्माननीय सुरेश शेंडगे व कोकणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव रासकर यांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हे काम निदर्शनास आणून दिले.

   अनेक कार्यकर्ते भेटीसाठी येत असल्यामुळे वेळ  नव्हता अगदी जेवण करायला सुद्धा वेळ मिळत नसल्याने आमदार साहेबांना कार्यकर्त्यांच्या समोर जनतेचे प्रश्न सोडवता सोडवता जेवण करावे लागले जेवण करत रविवार असताना सुद्धा आमदार साहेबांनी ठेकेदारांना फोन लावण्याचे काम केले व ताबडतोब ठेकेदाराने ते काम चालू केले त्यामुळे कोकणगावातील स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बबनदादा पाचपुते तसेच श्रीगोंदा तालुक्याचे तरुण तडफदार आमदार यांचे आभार मानले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव रासकर मणाले  सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणारा आमदार श्रीगोंदा तालुक्याला लाभला आहे. तसेच आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये देखील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून ते प्रश्न सोडविण्याचे काम करत आहेत. यावेळी सुरेशराव शेंडगे,गणेश जामदार,साहेबराव रासकर,सतीश राजपूत, नानासाहेब ठवाळ, पाराभाऊ श्रीराम, वंचित चे शिवाजी शिंदे, संतोष डोळसकर, संतोष भालेकर, गणेश भालेकर, सुभाषराव थोरात, दादासाहेब भिसे, सागर काळे, दादासाहेब ठवाळ आदी कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांचे विशेष आभार मानले आहेत

COMMENTS