नवी दिल्ली ः ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासंदर्भात अवमानकारक वक्तव्य करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांना सोमवारी पुन्हा एकद

नवी दिल्ली ः ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासंदर्भात अवमानकारक वक्तव्य करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांना सोमवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले असून, केवळ माफी मागून भागणार नसून कायदेशीर कारवाई होईल असे स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना फटकारले.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले ही कुठल्या प्रकारची माफी आहे? तुम्ही एक पब्लिक फिगर आहात. बोलताना शब्द तोलून मापून बोलणं हे तुमचं काम आहे. आम्हाला असल्या माफीची आवश्यकता नाही. आम्ही कायदेशीर कारवाई करु म्हणून तुम्ही माफीनामा दाखवत आहात. आम्ही या प्रकरणी विशेष तपास समिती तयार करण्याचे आदेश देत आहोत. ज्यामध्ये आयपीएस दर्जाचे तीन अधिकारी असतील. हे तिन्ही अधिकारी मध्य प्रदेशच्या बाहेरचे असतील. जे काही विजय शाह बोलले आहेत त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. विशेष तपास समितीने त्यांचा अहवाल 28 मे पर्यंत द्यावा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
COMMENTS