Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त समतेचा जागर

कोल्हापूर : लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त बहुजन समाज पक्ष,पश्चिम झोन च्या वतीने छत्रपतींची 'शाहूनगरी' कोल्हा

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
माजी खासदार उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर ?
कोपरगाव : सहकाररत्न कोल्हे शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
Displaying Hulgesh Chalwadi sir.jpeg

कोल्हापूर : लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त बहुजन समाज पक्ष,पश्चिम झोन च्या वतीने छत्रपतींची ‘शाहूनगरी’ कोल्हापूर येथे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शाहूनगरीतील इर्विन मल्टीपर्पज सभागृहात गुरुवारी, २६ जून रोजी मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी,माजी खासदार मा.राजाराम जी यांच्या प्रमुख उपस्थितीत,प्रदेश अध्यक्ष ऍड.सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बसप ने निवेदनातून दिली आहे.

छत्रपतींच्या जयंतीनिमित्त सकाळी ९ वाजता बिंदू चौक येथील महामानव महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी माजी खासदार राजाराम जी यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केली जाईल.विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब हयात असतांना मराठा समाजाकडून हा पुतळा उभारण्यात आला होता. ऐतिहासिक बिंदू चौकातून भव्य मिरवणूक काढत लेझीम,ढोल-ताशांच्या गजरात महोत्सवाची सुरुवात होईल. वाजतगाजत १०.३० वाजता शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक पोहोचेल.छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केल्यानंतर पुतळ्या समोरील रिंगणात मर्दानी खेळांचे सादरीकरण केले जाईल. दरम्यान सकाळी शाहूनगरीतील बिंदू चौकात तसेच दसरा चौक आणि शहरातील विविध ऐतिहासिक स्थळावर ‘लाडू वाटप’ केले जाईल,अशी माहिती डॉ.हुलगेश चलवादी यांनी दिली.

संपूर्ण शहरात ‘हत्ती’ निवडणूक चिन्ह असलेला निळा झेंडा लावून शाहूनगरीला ‘बसपा’मय केले जाईल.निळ्या झेंड्यांच्या रंगाने रंगलेल्या कोल्हापुरातील मुख्य ठिकाणी महापुरुषांचे मोठ-मोठे कट आउट्स लावून त्यांना बसपा आदरांजली वाहणार आहे.सकाळी ११ ते ६ दरम्यान इर्विन सभागृहात विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील बसपा चे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतक महोत्सवात उपस्थित राहतील.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात राज्यभरातून आलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच स्टेट कमिटी सदस्य राजर्षी शाहू महाराज यांच्यावर अभ्यासात्मक विचार मांडतील.तर, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात छत्रपती शाहू महाराजांवरील पोवाडे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाईल,असे डॉ.चलवादी म्हणाले.

छत्रपती शाहू महाराज हे समाजसुधारणेचे महान प्रतीक होते. त्यांनी जातिभेद, अस्पृश्यता यांविरुद्ध लढा देऊन शिक्षण, समता आणि न्यायाचा दीप प्रज्वलित केला. पीडित, वंचित, स्त्रिया, शेतकरी यांच्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या.कर्माला प्रतिष्ठा देत माणूसपणाचा सन्मान केला. त्यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली आणि आजही ते प्रेरणास्तंभ आहेत, या विचारांना समोर घेऊन जाने, हॆ आपले नीतिकर्तव्य असल्याची भावना डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त करीत महोत्सवात राज्यभरातून हजारो अनुयायी उपस्थित राहतील,अशी माहिती दिली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करावी,असे आवाहन समाजाला केले होते. शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या जयंतीदिनी समाजात उत्साहाचे आणि समता-बंधुभावाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी डॉ.बाबासाहेबांनी मांडलेल्या या विचारांचे अनुसरण करीत, बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री.बहन मायावती जी यांच्या दिशानिर्देशानुसार ‘राजर्षी शाहू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन डॉ.चलवादी यांच्या सह पश्चिम महाराष्ट्र पुणे झोन प्रभारी रामचंद्र जाधव,अप्पासाहेब लोकरे, ऍड.संजीवजी सदाफुले,किरण आल्हाट, कोकण झोन प्रभारी व कोल्हापूर जिल्हा कमेटी अध्यक्ष रविंद्र कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड,सातारा जिल्हाध्यक्ष लहरीदास कांबळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, सातारा जिल्हाध्यक्ष श्री.थारोडे यांनी केले आहे.

COMMENTS