Homeताज्या बातम्यासंपादकीय

बेजबाबदारपणाचे बळी !

राज्यात सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण पुण्यामध्ये एका उद्य

दहशतवादाचा बिमोड करण्याचे आव्हान
आर्थिक समतेचे काय
समान नागरी कायद्याच्या दिशेने !

राज्यात सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण पुण्यामध्ये एका उद्योगपतींच्या मुलाने कार अपघातात दोघांचे बळी घेतले. दोघांचा जीव घेवूनही त्याच्या चेहर्‍यावर आपण कोणतेतरी गुन्हेगारी कृत्यृ केल्याचा पश्‍चताप त्याला नाही. शिवाय काही तासांमध्ये त्याची सुटका होते, त्यानंतर समाजातून उमटलेल्या संतापातून सरकार आणि प्रशासन जागे झाले. ही घटना घडत नाही तोच, डोंबवलीमध्ये अमुदान कंपनीला लागलेल्या स्फोटामध्ये हकनाक 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. मात्र खरंच देशात आणि राज्यात कायद्याचे राज्य असेल तर, या कंपनीत खबदारीच्या उपाययोजना यापूर्वीच का करण्यात आल्या नव्हत्या. या कंपनीने भविष्यात आग लागू नये, आणि आग लागल्यास काय नुकसान होवू शकते, आणि ते टाळण्यासाठी कोणत्याच कशा उपाययोजना केल्या नाहीत. शिवाय या कंपनीची तपासणी करणारे, आणि प्रमाणपत्र देणारे उद्योगविभागाचे ते अधिकारी कोण, याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

आजमितीस मरण स्वस्त होत आहे. किड्या-मुंग्यांसारखे माणसं मरतांना दिसून येत आहे. अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा होतांना दिसून येत आहे. हकनाक बळी जात असतांना त्याचे कुणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात कायद्याचे राज्य आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रशासन आणि सरकारने आपल्या राज्य आणि देशामध्ये जो गैरव्यवहार सुरू आहे, याठिकाणी बेजबाबदारपणा आहे, त्यांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे. देशात कायद्याचे राज्य आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. असे असतांना सत्ताधार्‍यांकडून त्यांना पाठीशी घालण्याचे काम करण्यात येते, त्यामुळे आपण पैशांच्या बळावर काहीही करू शकतो, ही वृत्ती फोफावतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता देशात पैशांचे नव्हे तर कायद्याचे राज्य आहे, आणि इथल्या गरिबाला जो न्याय मिळतो, तोच इथल्या धनिकांना मिळतो, त्यामुळे ही मानसिकता दृढ करण्याची गरज आहे. ज्या उद्योगपतींच्या मुलाने दोघांना चिरडल्यानंतर त्याला तात्काळ जामीन मिळाल्यानंतर त्याने केलेले रॅम्प साँग अतिशय वेदना देणारे आहे. त्यातील शब्द तर जिव्हारी लागणारे आहे. माझ्याकडे असणार्‍या संपत्तीमुळे माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, असाच त्याचा अविर्भाव दिसून येतो. याबाबतचा एक किस्सा आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी समाजमाध्यमांमध्ये नुकताच शेअर केला आहे. त्या म्हणतात हा मुलगा आणि माझा मुलगा एकाच शाळेत होता, त्याचे वर्तन योग्य नसल्याची तक्रार करूनही ही तक्रार ना शाळेने स्वीकारली आणि त्याच्या पालकाने देखील. त्यामुळे तनपुरे यांनी आपल्या मुलाची शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता शाळांमध्ये संस्काराचे धडे देण्याची गरज असतांना, या मुलांना शाळांमधून देखील विशेष वागणूक दिली जाते.

शिवाय अशा बड्या बापांच्या अवलादींचा शिक्षकांना, प्राचार्यांना धाक असतो, जर आपण याविरोधात कारवाई केली तर आपलीच नोकरी जाईल का, अशी भीती असते, त्यामुळे शिक्षकवृंद दुर्लक्ष करतात. मात्र बड्या बापांनी देखील आपल्याकडे संपत्ती असली म्हणजे, आपण पाहिजे ते करू शकतो, ही मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. त्यासाठी कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे, याची जाणीव या लोकांना करून देण्याची गरज आहे. मात्र या आरोपींना आपली व्यवस्था बर्गर पुरवते, कित्येक तास त्यांच्या रक्ताची तपासणी करत नाही, या सर्व बाबी बघता व्यवस्थाच आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून मग अशी विषारी वल्ली जन्माला येतात. डोंबवलीमध्ये खबदारीच्या उपाययोजना का करण्यात आलेल्या नाहीत, हजारो लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्याचे नुकसान कोण भरून देणार आहे, या सर्व बाबींचा उहापोह होण्याची गरज आहे. या मस्तवाल लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS