Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गुरूवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांची प्राणज्योत मालव

…तर रात्रीचे निर्बंध मुंबईत दिवसाही लागू ; पालकमंत्र्यांचा इशारा; दररोज दहा हजार रुग्ण आढळण्याची भीती
गुजरातमध्ये कार-बसच्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू
शहरात अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग सुरू

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गुरूवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी (दि 27) संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
बाबा माहाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी तीननंतर अंत्यदर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल. नीळकंठ ज्ञानेश्‍वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्‍यात झाला. त्यांचे शिक्षण हे 10 पर्यंत झाले. त्यांच्या घरी अनेक वर्षांपासूनची वारकरी परंपरा असल्याने बाबा महाराज सातारकर यांनी देखील ही वारकरी सांप्रदायाची परंपरा जोपासली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्‍वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक तर त्यांची आई लक्ष्मीबाई ज्ञानेश्‍वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज हे कीर्तन करायचे. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. बाबा महाराज सातारकर यांनी त्यांच्या जीवनात विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्‍वरी यावर कीर्तणे केली. त्यांनी देशातच नाही तर परदेशात देखील कीर्तणे केली आहे. त्यांचे कीर्तन एकण्यासाठी हजारोच्या संख्येने समुदाय जमायचा. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. तसेच वय झाल्यामुळे त्यांना उभे देखल राहता येत नव्हते. यामुळे काही काळापासून ते कीर्तन करत नव्हते. सध्या त्यांचा नातू त्यांची कीर्तनाची ही परंपरा पुढे नेत आहे.

COMMENTS