Homeताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

मुंबई ः ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. मागील बर्‍याच वर्षांपासून ते

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आजच घेण्याचे निर्देश
द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ
घरमालकाने भाडेकरूने पैसे दिले नाही म्हणून त्याच्या राहत्या घराला आग लावली

मुंबई ः ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. मागील बर्‍याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये ’व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011 मध्ये ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. पण कलेशी एकरुप झाल्याने त्यांनी या संकटांवर मात केली होती. नाटकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कर्करोगाने त्रस्त असूनही ते नाटक पाहायला जात असत. रवींद्र बेर्डे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे सख्खे भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे होते. तर चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हेदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. रवींद्र बेर्डे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

COMMENTS