मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ‘हिरो’ & ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा Dharmendra यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सोमवारी मुंबईतील आपल्या घरावर अंतिम श्व

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ‘हिरो’ & ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा Dharmendra यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सोमवारी मुंबईतील आपल्या घरावर अंतिम श्वास घेतला आहेत. धर्मेंद्र यांच्या जुहू येथील राहत्या घरात सोमवारी साधारणतः साडेबाराच्या सुमारास एक रुग्णवाहिका पोहोचली. त्यावेळी चाहत्यांच्या काळजाची धाकधूक वाढलेली. धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या घरी नातेवाईकांची रांग लागली. धर्मेंद्र यांच्या मुलीही जुहूतल्या घरी पोहोचल्या. याच दरम्यान, धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तेवढ्याच विले पार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत हेमा मालिनी आणि ईशा देओल या दिसल्या. कुणाला काही कळण्यापूर्वीच सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकण्यात आलेले. अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलनं मुखाग्नी दिला आणि तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा बॉलिवूडचा ही-मॅन अनंतात विलिन झाला.

COMMENTS