Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘व्यंकटेशा’! कुठं फेडशील हे पाप !

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई शहर इलाखा विभाग सध्या चर्चेत येण्याचे प्रमुख कारण म्हणजे या विभागातील अधिकार्‍यांसंदर्भात चुकीच्या वावड

त्या’ 6 खासगी सावकारांची पोलिस करणार चौकशी ?
मागासवर्गीय संस्थांच्या विरोधात महाधिवक्तांना उतरवणे योग्य का ?
सचिव भांगेंमुळे अनु. जाती- नवबौध्दाचे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून राहणार वंचित

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई शहर इलाखा विभाग सध्या चर्चेत येण्याचे प्रमुख कारण म्हणजे या विभागातील अधिकार्‍यांसंदर्भात चुकीच्या वावड्या उठवून त्यासंदर्भातील चुकीची माहिती आपल्या पुरवण्याचा गोरखधंदा सध्या या ‘व्यंकटेशा’ने सुरू केला आहे. या चुकीच्या माहितीच्या आधारेच ‘कुमार’ने आपण नवा शोध लावल्याच्या अविभार्वात बातमीदारी सुरू केली आहे. मात्र ‘व्यंकटेशा’ची माहिती कितपत खरी, याची कोणतीही सत्यता या ‘कुमार’ने न पडताळता केवळ कंपूगिरीला खतपाणी घालत आपणही त्यातलेच असल्याचे सिध्द केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काहींनी गोरखधंदा सुरू केला असून, त्यांनी माहितीच्या आधारातून अधिकार्‍यांना त्रास देण्याचा विडा या कंपू मंडळींनी उचलल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच या अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा उद्योग या महाभागांनी सुरू केला आहे. आता नवं ‘प्र’-‘हार’ हाती आलं म्हणून ‘कुमार’ कंपू मंडळी आनंदानं उड्या मारतांना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना बदनाम करून पैसा उकळण्याचे नवं षडयंत्र या ‘व्यंकटेशा’च्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. मात्र ‘व्यंकटेशा’ चांडाळचौकडी जमा करून त्यातून बक्कळ पैसा कमवून त्यातील बराचसा पैसा एका आंदोलनात तू खर्ची केला, त्याची कुंडलीच आमच्याजवळ उपलब्ध असतांना देखील आम्ही त्या मार्गाला जात नाही. मात्र उगाच अधिकार्‍यांच्या पाठीमागे लागून त्यांच्यामाग चुकीच्या पद्धतीनं चौकश्यांचं शुक्लकाष्ठ मागे लावून तु आनंदाने झोप कसा घेऊ शकतोस. खरंच या अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केला असेल तर, या लढ्यात आम्हीही तुझ्या बाजूनं उतरलो असतो. मात्र उगाच ‘कुमार’ कंपू मंडळीला हातात धरून ‘तु’ त्या अधिकार्‍यांची बदनामी करत तु नामानिराळा होत असेल, तर त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. त्यामुळं व्यकंटेशा पुन्हा एकदा विचार कर एवढाच आमचा तुला मोलाचा सल्ला.  

COMMENTS