सुपा ः राज्यातील दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना शनिवार 8 जून रोजी राज्यस्तरीय पुरस्कारने स
सुपा ः राज्यातील दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना शनिवार 8 जून रोजी राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील अण्णासाहेब शिंदे सभागृहात हा सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी पत्रकार वाधवान यांना दिशाशक्ती मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी पै. रावसाहेब (नाना) खेवरे जिल्हाध्यक्ष शिवसेना (उ.बा.ठा.) शरद बाचकर प.महा. अध्यक्ष रासप, डॉ.अण्णासाहेब बाचकर माजी उपसभापती कृ.उ.बा.स., राहुरी, विजयराव तमनर जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना, गोरक्षनाथ शेटे सुरक्षा अधिकारी, रामदास बाचकर संचालक कृ.उ.बा.स., राहुरी, दिव्यांग प्रहार जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, मा.सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, सचिन कोळपे, उमेश बाचकर, बाळकृष्ण कोकाटे मुख्य संपादक दिशाशक्ती मिडिया समूह, रमेश खेमनर कार्यकारी संपादक दिशाशक्ती मिडिया, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ शिंदे, हिरवगार पठर युवक संघटक राजू गोसावी, ठकसेन औटी, संदिप पावडे, पत्रकार गांगासागर पोकळे,युवा ग्रामीण पत्रकार संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे पाटील, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, आर. आर. जाधव,राजेंद्र म्हसे, राजेंद्र पवार, शरद पाचारणे, मनोज साळवे, नाना जोशी, देशस्तंभ न्यूजचे सत्यवान नवगिरे, निलेश ठोंबरे, त्याचप्रमाणे राज्यातून विविध क्षेत्रातून आलेले पुरस्कार्थी उपस्थित होते. खासदार निलेश लंके, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, दैनिक अक्षराज मिडियाचे मुख्य संपादक विनोद गोरे, सहसंपादिका प्राजक्ता चव्हाण-गोरे, पत्रकार राजकुमार इकडे, पारनेर तालुक्यातील राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS