Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने वसंत रांधवण सन्मानित

सुपा : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वसंत भानुदास रांधवण यांना ज

बेलापुरात चार गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद
अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सातपुते
जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया चक्क मध्यरात्रीपर्यंत होती सुरू

सुपा : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वसंत भानुदास रांधवण यांना जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव-2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार शनिवार 22 जून रोजी सकाळी अकरा वाजता नगर शहरातील लक्ष्मीनारायण सभागृह अहमदनगर येथे सरसेनापती यशवंत सेना मुंबई माधव गडदे, यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष विजय तमनर, देविदास कोकाटे, रमेश खेमनर,जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, प्रकाश भामरे, राजेंद्र तागड, श्रीरंग गडदे, प्रेमानंद महाराज शास्त्री,सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला नलावडे, उज्वला राजगुरू,यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संघटनेत स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटाऊन आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार निलेश लंके, टाकळीढोकेश्‍वर ग्रामपंचायतचे सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, टाकळीढोकेश्‍वर ग्रामस्थ तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, दैनिक अक्षराज मिडियाचे मुख्य संपादक विनोद गोरे, सहसंपादिका प्राजक्ता चव्हाण – गोरे व पत्रकार राजकुमार इकडे, पारनेर तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी विषयी रांधवण याचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS