Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

सुपा : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष, पत्रकार वसंत रांधवण यांची राज्यातील दिशाशक्ती मीडिया समूह यांच्यावतीने दिल

सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?
देहरेत सोयाबीन पिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक उत्साहात
कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सुपा : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष, पत्रकार वसंत रांधवण यांची राज्यातील दिशाशक्ती मीडिया समूह यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 करीता नुकतीच निवड करण्यात आली असल्याचे दिशाशक्ती मीडिया समुहाचे अध्यक्ष व मुख्य संपादक बाळकृष्ण कोकाटे व कार्यकारी संपादक रमेश खेमनर यांनी वसंत भानुदास रांधवण यांना निवडीचे पत्र देऊन कळवीले आहे.
शनिवार 8 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता अण्णासाहेब शिंदे सभागृह, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामवंत लेखक आणि मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 देऊन वसंत रांधवण यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आम्ही दिशाशक्ती मेडिया समुहाकडून वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला असल्याचे मुख्य संपादक बाळकृष्ण कोकाटे यांनी सांगितले आहे. दिशाशक्ती समाजातील मानबिंदू असलेल्या डोळासणे, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथुन प्रकाशित होत असलेले भारत सरकार नोंदणीकृत असलेले  दिशाशक्ती मीडियाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. हा पुरस्कार जाहीर जाहीर झाल्याबद्दल पारनेर तालुक्यासह जिल्ह्यांतील पत्रकारांनी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वसंत रांधवण यांचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS