निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज दखल घेतो : हभप बंडातात्या कराडकरकुडाळ / प्रतिनिधी : देव, देश, धर्मासाठी कार्य करत असताना निस्वार्थपणे केलेल
निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज दखल घेतो : हभप बंडातात्या कराडकर
कुडाळ / प्रतिनिधी : देव, देश, धर्मासाठी कार्य करत असताना निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज दखल घेत असतो. यात कोणतेही कार्य छोटे-मोठे नसते. यामुळे जे वाट्याला येईल ते काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. या वृत्तीने आज व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते अनेक पातळीवर चांगले काम करत असून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे, असे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी केले
राष्ट्रबंधु राजीव दीक्षित गुरूकुल पिंपरद ता. फलटण येथील गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी गुरूकुलचे अध्यक्ष गवळी, संस्थेचे अध्यक्ष दिपक जाधव उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपल्या गावासाठी, जन्मभूमीसाठी आणि समाजासाठी उल्लेखनिय कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, यासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. यावेळी अल्पावधित अनेक अभिनव व कल्पक उपक्रम राबविणार्या जवळवाडी, ता. जावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वर्षाताई जवळ यांना ग्राम रणरागिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान शेरे (ता. कराड) यांना वृक्षसंवर्धन पुरस्कार, युवावक्तेजगन्नाथ शिंदे यांना मायभू सेवा पुरस्कार, भानुदास वैरट आणि सहकार्यांचे वृक्षसंवर्धन ग्रुप पिंपरी चिंचवड यांना वृक्ष संवर्धन पुरस्कार तर रमेश माने यांना भारत भ्रमंती पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुत्रसंचलन बाळासाहेब शेरेकर यांनी केले. मुख्याध्यापिका माई यांनी आभार मानले.
COMMENTS