लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन संगमनेर : माजी मंत्री तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील निमगा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
संगमनेर : माजी मंत्री तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील निमगाव जाळी येथे विविध शालेय स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राजहंस दूध संघाच्या संचालिका प्रतिभाताई जोंधळे यांनी याबाबत माहिती दिली.
याबाबत सांगताना प्रतिभा जोंधळे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे तालुक्याचे भाग्यविधाते व कुटुंबप्रमुख असून त्यांचा वाढदिवस संपूर्ण तालुका हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. निमगाव जाळी गाव हे कायम बाळासाहेब थोरात यांच्या विचारांच्या पाठीशी भक्कमपणे असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील शाळेत वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व बक्षीस वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी, पालकांनी व ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच प्रतिभा जोंधळे, माजी चेअरमन रंगनाथ वदक, सुखदेव डेंगळे, रावसाहेब थेते, मोहन वदक, सोसायटी चे संचालक सोमनाथ जोंधळे, अशोक भोसले, गोरख वदक, तान्हाजी जोंधळे, दत्तू तळोले, संजय वदक, विद्यालयाचे प्राचार्य गागरे सर सर्व स्टाफ. व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS