Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कास’ पठारावर विविध रंगी फुलांना बहर

गुलाबी-पिवळ्या-निळ्या-जांभळ-पांढर्‍या फुलांची निर्सगाने अंथरली चादर

सातारा / प्रतिनिधी : कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पठारावर पर्यटकांची पावले पठाराकडे वळू लागली आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवा

सिंहगडावर सापडले प्राचीन पटखेळांचे अवशेष
नशेखोर तरुणांना महिला कर्मचाऱ्यांनी दिला चोप l LOK News 24
आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी

सातारा / प्रतिनिधी : कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पठारावर पर्यटकांची पावले पठाराकडे वळू लागली आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार अशा सलग सुट्ट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे. पावसाने बर्‍याच दिवसाने उघडीप दिल्याने कास पठार व बामणोलीकडे जाण्याचा पर्यटकांचा कल वाढला आहे. पठार विविध जातीच्या फुलांनी बहरल्याने सप्तरंगी चादर पसरल्यासारखे दिसत आहे. आतापर्यंत सुमारे 20 हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिली असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. रविवारच्या एका दिवसासाठी 2 हजार पर्यटकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.  

सलग सुट्टीचा दिवस असल्याने देश विदेशातील पर्यटकांनी कास पठारावर फुले पाहण्यासाठी गर्दी केली आहे. सध्या कास पठारावर तेरडा या तांबड्या फुलांनी पठार फुलले आहे. तसेच सात वर्षातून एकदा फुलणारी टोपली कारवी ही फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. याचबरोबर गेंद, धनगरी फेटा, चवर, दीपकांडी, आभाळी, नभाळी, सीतेची आसवे, सोनकी, भारांगी, तुतारी, कुमुदिनी तलावामध्ये कुमुदिनी यासह असंख्य छोट्या-मोठ्या वेगवेगळ्या प्रजातीमधील फुले पूर्णपणे उमलली आहेत. ऐन गणेशोत्सवात पावसाने उघडीप दिल्याने पठार आणखी विविध फुलांनी बहरत आहेत. रविवार, सोमवार व मंगळवार अशा तीन दिवस परत सलग सुट्ट्या असल्याने कास पुष्प पठारावर पर्यकांची वर्दळ आणखी वाढू लागली आहे.

शासनाच्या वतीने दि. 5 सप्टेंबर रोजी कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू करण्यात आला. सद्यस्थितीत पर्यटकांची संख्या वाढत असून गत 10 दिवसात सुमारे 12 ते 15 हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिली आहे. कास कार्यकारी समितीने आता ऑनलाईन बुकिंगही सुरू केले आहे. याचा फायदाही पर्यटकांना होत आहे. ऑनलाईनसह स्थानिक पर्यटकही गर्दी करत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणखी गर्दी करणार असल्याने तसे नियोजन वन विभाग आणि कास समितीकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाने उघडीप दिली असल्याने कास पठारासह कास तलावातील पाण्याचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

COMMENTS