Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धमान महावीर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कडा । प्रतिनिधीवर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त महावीर इंग्लिश स्कूल, कडा येथे उडाण-2025 या 14व्या वार्षिक स्ने

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधार्‍यांची तात्काळ दुरुस्ती करा
आ. सुरेश धस यांना फेसबुक पोस्टद्वारे धमकी; कडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कड्यात शोकसभेनिमित्त कडकडीत बंद

कडा । प्रतिनिधी
वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त महावीर इंग्लिश स्कूल, कडा येथे उडाण-2025 या 14व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सामाजिक जाणीवेला वाव देणारा हा कार्यक्रम पालक व नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमासाठी सीबीएसई बोर्ड सीओई, पुणे येथील सेक्शन ऑफिसर पल्लवी माळी मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आष्टी येथील कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार श्री. भागीरथ धारक यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर एसबीआय बँकेचे मॅनेजर श्री. प्रशांत झाडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमित राठोड, उपाध्यक्ष संदीप चांनोदिया, सचिव हेमंत मेहेर, कोषाध्यक्ष प्रमोद भळगट यांच्यासह पदाधिकारी मनीष गांधी, प्रकाश श्रीश्रीमाळ, अमोल पटवा, संजय पितळे, संतोष गांधी, सल्लागार पी. जी. मेहेर, मुख्याध्यापक अभिलाष के. के., उपमुख्याध्यापिका श्रीमती अफशान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात महिला सशक्तीकरण या संकल्पनेवर आधारित नाटिका व नृत्याविष्कार सादर करण्यात आले. रूढीवादी विचार व भेदभावापासून मुक्ती, शिक्षण-आरोग्य आणि सामाजिक निर्णयप्रक्रियेत समान हक्क व संधी यांवर प्रकाश टाकणार्‍या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. या स्नेहसंमेलनास कडा व परिसरातील पालकवर्ग तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS