Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्याची वंचितची मागणी

पाथर्डी ः पाथर्डी शहरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वरील पोळा मारुती मंदिर कसबा पेठ, श्री तिलोक जैन विद्यालय समोर,शिक्षक कॉलनी माळीबाभूळगाव व अन्न

पाचशेवर कामगारांची झाली एचआयव्ही तपासणी; अमृतदीप प्रकल्पात स्थलांतरीतांना आरोग्य मार्गदर्शन
पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालया कडून सत्कार
बेलापुरात वीज मोटारीच्या केबल चोरणारे चोरटे पकडले

पाथर्डी ः पाथर्डी शहरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वरील पोळा मारुती मंदिर कसबा पेठ, श्री तिलोक जैन विद्यालय समोर,शिक्षक कॉलनी माळीबाभूळगाव व अन्न पूर्णा हॉटेल समोर माळी बाभूळगाव येथे रोजच छोटे मोठे अपघात घडत असल्यामुळे सदर ठिकाणी गतीरोधक बसविण्यात यावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता यांना वंचितचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष अरविंद दगडू सोनटक्के आणि तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फे भोरू म्हस्के यांनी निवेदन दिले असून येत्या आठ दिवसात करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोळा मारुती मंदिर येथे सकाळी व संध्याकाळी दर्शनाला येणार्‍यांची व श्री तिलोक जैन विद्यालय येथे विद्यार्थ्यांची शाळा भरणे,मधली सुट्टी व शाळा सुटताना लहान मुलांची तसेच तहसिल कचेरी व पोलिस ठाणे येथे कामासाठी येणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणत वर्दळ असते.सतत वर्दळी असणारी हि ठिकाणे रोजच अपघात घडत असतात त्यामुळे वादाचे प्रसंग अनेकदा उद्भवत आहेतश्‍व भांडणे मारामार्‍या घडत आहेत.त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.लहान मुलांच्या व नागरिकांच्या मोठा अपघात झाल्यास जीविताची हानी होऊ शकते याचा गांभीर्यपूर्वक विचार करून वरील ठिकाणी येत्या आठ दिवसात गती रोधक बसविण्यात यावी.

COMMENTS