Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीच्या दणकेने कामाला सुरुवात-संदीप जाधव

वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश

बीड प्रतिनिधी - बीड शहरातील प्रभाग क्रमांक चार नागोबा गल्ली येथील मातोश्री मंगल कार्यालय ते चांदणे वाडा या ठिकाणी नालीचे काम सुरू करण्यात आले हो

ऑस्ट्रेलियामध्ये हैदराबादच्या महिलेची हत्या
कृषीमंत्री मुंडे, पालकमंत्री सावे हरवले
दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा ः खा. जलील

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील प्रभाग क्रमांक चार नागोबा गल्ली येथील मातोश्री मंगल कार्यालय ते चांदणे वाडा या ठिकाणी नालीचे काम सुरू करण्यात आले होते पण नाली फक्त खोदून ठेवून महिना उलटला तरीही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती व त्या नालीचे पाणी पूर्ण रस्त्यावर येत होते व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते परिसरातील नागरिकांना आबालवर्द्धांना येण्या जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते काही अपघातही घडले. तरीसुद्धा काम बंद असल्यामुळे  वंचित बहुजन आघाडी चे शहर महासचिव संदीप जाधव यांनी नाली व रस्त्याची पाहणी करून नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने काम सुरू करण्याचे विनंती केली व नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. व काम सुरू झाल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे बीड शहर महासचिव संदीप जाधव यांचे आभार मानले.

COMMENTS