Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मीक कराड याला 14 दिवसांची न्यायालयी

आजचे राशीचक्र रविवार, ०७ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा (Video)
सीमा प्रश्‍नाबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडण्याच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा : ना. शंभूराज देसाई
जगाला आज बंदुकीची नाही… सदभावनेची गरज : सायकल यात्रा शिबिरात डॉ. सुब्बराव यांचे प्रतिपादन

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मीक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने बुधवारी वाल्मीक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मीक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मीक कराडला बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का, हे बघावे लागेल. मात्र, मकोका लागल्याने कराडला तूर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, कराड याने 31 डिसेंबरला पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्कारली होती. तेव्हापासून कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. कराड याच्या समर्थकांनी मध्यंतरीच्या काळात त्याच्या सुटकेसाठी परळी आणि आष्टी परिसरात निदर्शने केली होती. यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही कराड याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. एरवी न्यायालयीन कोठडीतील आरोपीला जामीन मिळणे सोपे असते. मात्र, कराडला मकोका लागल्याने त्याला जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.

COMMENTS