Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई समृद्धी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव आढाव

उपाध्यक्षपदी शरद वाघ बिनविरोध निवड

कोपरगाव तालुका ः अल्पावधीत नेत्रदीपक प्रगती करून इतर सहकारी पतसंस्थांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या कोपरगाव येथील साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थे

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करा ः मनसे
भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन

कोपरगाव तालुका ः अल्पावधीत नेत्रदीपक प्रगती करून इतर सहकारी पतसंस्थांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या कोपरगाव येथील साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव सुधाकरराव आढाव तर उपाध्यक्षपदी शरद वसंतराव वाघ यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व  विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडण्यासाठी 10 जानेवारी 2024 रोजी बिनविरोध निवडणूक झाली होती. पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (12 फेब्रुवारी) नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव आढाव व उपाध्यक्षपदी शरद वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक रमेश आभाळे, अप्पासाहेब काजळे, संदीप बारगळ, गोरख टुपके, अमोल घुमरे, रवींद्र पोळ, कृष्णकांत सानप, वृषाली ज्ञानदेव आसने, वृषाली प्रमोद कोताडे आदींची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा वाळके यांनी काम पाहिले. त्यांना पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रदीप गायकवाड यांनी सहकार्य केले. यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी अनेक सहकारी संस्था स्थापन करून त्या नावारूपाला आणल्या. त्यांनी सहकारी पतसंस्था, बँका व इतर सहकारी संस्थांना नेहमीच पाठबळ देऊन सहकार वाढविण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोल्हे परिवार विविध सहकारी संस्थांना पाठबळ देत त्यांच्या प्रगतीसाठी काम करीत आहे. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शरदनाना थोरात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्‍वासराव महाले, माजी पं. स. सभापती मच्छिंद्र टेके, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास रोहमारे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS