Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडसिंग नागनाथ महाराजांच्या  राष्ट्रीय धार्मिक सप्ताहाची सांगता

परिसरात चैतन्यमय वातावरण

चांदवड प्रतिनिधी - चांदवड तालुक्यातील गंगावे येथे रविवार दि.११ऑगस्ट रोजी वडसिंग नागनाथ महाराज यांच्या धार्मिक सप्ताहाची सांगता नाशिक येथील वारकर

पुलाच्या खर्चातील साडेतीनशे टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला
सासऱ्याच्या प्रेमात पडलेली पत्नी मुलांना टाकून फरार l LOKNews24
विखेंच्या नाकाखालील डोंगर पोखरला, खासदार झाले संतप्त

चांदवड प्रतिनिधी – चांदवड तालुक्यातील गंगावे येथे रविवार दि.११ऑगस्ट रोजी वडसिंग नागनाथ महाराज यांच्या धार्मिक सप्ताहाची सांगता नाशिक येथील वारकरी भूषण ह.भ.प.माधवदास राठी यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. प्रसंगी रविवारी सकाळ पासूनच भाविक भक्तांची मांदियाळी सुरुवात झाल्याने लाखोंचा जनसमुदाय श्री क्षेत्र गंगावे विटावे या ठिकाणी दिसून आला. नागनाथांच्या १०८ कलशारोहनाचा मुख्य  कार्यक्रम  श्री श्री १००८ श्री महंत गणेशानंद सरस्वती (त्र्यम्बकेश्वर) , जगतगुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी १००८ स्वामी शांतिगिरी महाराज (वेरूळ)  , श्री श्री १००८ महामंडलेश्वर गिरीधरगिरीजी महाराज (हरिद्वार) , शिवभक्त सुखदेव नाना कोल्हे , श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज (निफाड) , श्री महंत बाल विदुषी साध्वी कात्यायगिरी महाराज जुन्नर, श्री श्री १००८ महामंडलेश्वर पार्वतामाई जोगी (किन्नर आखाडा) , श्री महंत सोमेश्वरगिरीजी महाराज (शिवटेकडी), श्री महंत स्वामी परमेश्वर गिरीजी (पिंपळस) , श्री महंत गोपालदासजी महाराज , शिवभक्त हृदयानन्द माऊली (ओझर) , आयोजक डॉ. प्रकाश कोल्हे सरांसह हजारो भाविकांच्या उपस्थित पार पडला.

गेल्या सप्ताहात सातही दिवस विविध साधु महंत यांनी हजेरी लावली असल्याने दररोज गंगावे येथे भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवार रोजी वडसिंग नागनाथ महाराज यांच्या १०८ कलशाची शाही मिरवणुक १०८ ट्रॅक्टर वर काढण्यात आली. भव्य मिरवणुक साधारण अडीच ते तीन  किमी अंतराने व्यापलेल्या अथांग जनसमुदायाने व्यापल्याने पंढरपुर च्या विठ्ठलासह वारकरी साक्षात गंगावे येथे दाखल होते .

सात दिवस सुरू असलेल्या १०८ अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ सोहळ्याची सांगता पंच दसनाम जुना आखाड्याचे जगतगुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या सह विविध मठाचे मठाधिपती व महंत यांच्या हस्ते पूर्ण आहूती देऊन सांगता करण्यात आली. 

भारतातील पहिले १०८ कलश असलेले मंदिर श्री क्षेत्र गंगावे येथे वडसिंग नागनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पूर्णत्वास आले. १०८ ट्रॅक्टरवर  १०८ कलशाची शाही मिरवणूक काढण्यात आली. तसेच १०१ शंखनाद उत्तम साधकांच्या हस्ते करण्यात आला , ढोल पथक , पारंपारिक संबळ वादन , हजारो कलश धारी महिला व कुमारिका , कळस सेवा घेतलेले सेवेकरी , रोज १०८ अतिरुद्र यज्ञ सोहळ्यासाठी रोज तीनशे ते पाचशे यजमान (जोडपे)  श्रद्धापूर्वक हजेरी लावत होते. 

या सप्तहात ज्या ज्या  महान विभातींची श्री वडसिंग नागनाथ महाराजांच्या कार्यक्रम स्थळी उपस्थिती लाभली त्यामुळे मी विशेष आभारी आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून समस्थ ग्रामस्थ गंगावे , विटावे येथील सेवेकरी यांचे देखील विशेष आभार व्यक्त करतो. नागनाथांचे सेवेकरी म्हणून ज्या ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग देऊन आपले सहकार्य केले. अशा सर्व गुणी जणांचे कल्याण होऊन श्री वडसिंग नागनाथ महाराज नेहमीच त्यांच्या शुभ कामी सोबत असतील यात शंका नाहीत. आयोजक – डॉ. प्रकाश दादा कोल्हे सर 

COMMENTS