Homeताज्या बातम्यादेश

तिहेरी हत्याकांडामुळे उत्तर प्रदेश हादरलं! 

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशच्या कौशंबी येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.तेथे झालेल्या तिहेरी हत्येने संपूर्ण गावातच

उद्योजकाला प्रेमात अडकवून उकळले सव्वा कोटी
मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणार्‍या महिलेवर गुन्हा
ऐन रमजानमध्ये घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीचे पतीवर चाकूने वार

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशच्या कौशंबी येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.तेथे झालेल्या तिहेरी हत्येने संपूर्ण गावातच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीपन घाट क्षेत्राजवळ असलेल्या गावात रात्रीच्या सुमारास वडील, मुलगी आणि जावयाची हत्या करण्यात आली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडल्याने गावकरी हादरले. मात्र त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींच्या घराला थेट आग लावली.या घटनेनंतर गदारोळ वाढल्यानंतर पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमीनीच्या वादावरून हे भयानक हत्याकांड घडल्याची चर्चा सुरू आहे. या हत्याकांडातील आरोपींना लवकरात सलवकर अटक करून कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण संदीपन घाट पोलीस स्टेशन हद्दीतील हररायपूरच्या पाटणा चौकातील आहे. मृत कुटुंबाचा शेजाऱ्यांसोबत जमिनीसदंर्भात वाद सुरू होता. त्या मुद्यावरून त्यांच्यात यापूर्वीही भांडणे झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्री इशीरा आरोपींनी पीडितेच्या कुटुंबावर हल्ला केला. लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या आरोपींनी मृताच्या कुटुंबातील दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला केला. ते जमिनीवर कोसळेपर्यंत आरोपी त्यांना मारहाण करत राहिले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसमाची गरोदर मुलगी आणि जावई हेदेखील दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी आले. आरोपींनी पीडित इसमावर हल्ला केला असता, त्याची मुलगी व जावई त्यांना वाचवण्यास पुढे आले. तेव्हा आरोपींनी त्यांना सोडले नाही व त्यांच्यावरही जबर वार केले. त्यामध्ये जखमी झालेल्या त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तीन जणांच्या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले

COMMENTS