Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परीषदेच्या स्वार्थी आधिका-यांची नासावारी वापरुन शासनाची तिजोरी बेशरमांच्या फुलांच्या पायघड्या घालत कागदी विमान उडवत  लक्ष्यवेधी आंदोलन:- डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - बीड जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा प्रशासकीय मनमानी कारभाराने हद्द पार केली असुन विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा अभ्यास

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भेगा थातुरमातुर बुजवणे नव्हे तर ब्लॉक कट करुन दुरुस्ती सुरू-डॉ.गणेश ढवळे
बीड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणात मुख्य न्यायाधीश हेमंत महाजन यांना निवेदन-डॉ.गणेश ढवळे
सीईओ अजित पवार साहेब बोगस दिव्यांग शोध मोहीम कारवाईसाठी की मलिदा लाटण्यासाठी? जवाब दो आंदोलन-डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी – बीड जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा प्रशासकीय मनमानी कारभाराने हद्द पार केली असुन विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा अभ्यास दौ-यासाठी  विज्ञान आणि गणित विषयाशी संबंधित तज्ञ सोबत जाणे अपेक्षित असताना मनमानी कारभार करत जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या पैशाचा गैरवापर करत कुटुंबियांसह दौर्‍यावर जाण्याच्या तयारीत असुन या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.4 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ऑफिसच्या वेळी प्रवेशद्वारावर बेशरमाच्या फुलांची उधळण करत पायघड्या घालत बहारो फुल बरसाओगाण्याच्या सुरात तसेच कागदी विमान उडवत लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात पत्रकार बालाजी मारगुडे, पत्रकार भागवत तावरे, शेख युनुस, मिलिंद सरपते, शिक्षण हक्क अधिकार कार्यकर्ते मनोज जाधव,संतोष ढाकणे,आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे,प्रविण पवार, आल इंडिया पँथर सेना बीड जिल्हाध्यक्ष नितिन सोनावणे शेख मुबीन, रामनाथ खोड, राहुल कवठेकर, धनंजय सानप,शेख मुबीन,शेख मुस्ताक,आदि. सहभागी होते.
बीड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी 11 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधनाच्या अभ्यास सहलीसाठी निवड झालेली आहे.या विद्यार्थ्यांवर जवळपास कोटी ते दिडकोटी खर्च शासन करणार आहे ही स्तुत्य बाब असली तरी या विद्यार्थ्यांसोबत नियमानुसार 4 अधिकारी जे गणित व विज्ञान विषयाशी संबंधित तज्ञ आहेत अशांनी सोबत जाणे अपेक्षित आहे.मात्र शासन खर्च करत आहे म्हणून सीईओ पासुन खालचे 9 अधिकारी सहकुटुंब सहलीला निघाले आहेत ज्यामध्ये सीईओ अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, निरंतर शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक, वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे व अन्य अधिकारी जाणार आहेत.11 विद्यार्थ्यांसाठी विषयाशी संबंधित नसणारे 9 आधिका-यांची टीम ते सुद्धा सहकुटुंब हा शासनाचा पैशाचा गैरवापर असुन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ स्वार्थी आधिका-यांची नासावारी, वापरून शासन तिजोरी लक्ष्यवेधी गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे.

COMMENTS