Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपारंपारिक ऊर्जा वापरास चालना द्यावी : अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

छत्रपती संभाजीनगर : देशाच्या ऊर्जानिर्मितीतील अधिक भाग हा कोळसा आणि पेट्रोलियम इंधनांवर खर्च होतो. हे इंधन आयात करावे लागत असल्याने देशाची परकीय

महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा
लोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायती अंतर्गत 14 रिक्त जागांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
कोल्हापूर, सांगलीला पुन्हा महापुराची धास्ती

छत्रपती संभाजीनगर : देशाच्या ऊर्जानिर्मितीतील अधिक भाग हा कोळसा आणि पेट्रोलियम इंधनांवर खर्च होतो. हे इंधन आयात करावे लागत असल्याने देशाची परकीय चलनाची गंगाजळीतील मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. ही बचत करण्यासाठी सौर ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जेचे अन्य पर्यायांचा वापर करण्यास चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यास चालना देण्यासाठी नागरिकांनी पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करावा,असे आवाहन अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) आणि ऊर्जा दक्षता ब्युरो (BEE) यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले. टीव्ही सेंटर मैदानापासून या रॅलीस प्रारंभ झाला. महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विनोद सिरसाट, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा, महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, महेंद्र ढवले, प्रकाश पेटवडेकर, किशन धोत्रे आदी उपस्थित होते.

श्री. सावे म्हणाले की, ऊर्जेची बचत करणे म्हणजेच ऊर्जेचे उत्पादन करणे होय. मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाला इंधन आयात करावे लागते. त्यामुळे पर्यायी ऊर्जेचा वापर करुन ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे हे आपल धोरण आहे. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता लोकप्रतिनिधींनाही इलेक्ट्रीक वाहने वापरण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे आयात इंधन वापरास पर्याय उपलब्ध करुन आपण परकीय चलनाचीही बचत करु शकतो,असे सावे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की. छत्रपती संभाजीनगर हे क्षेत्र इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीत अग्रेसर आहे. देशातील अग्रगण्य उद्योजक या ठिकाणी इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचे उद्योग उभारत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

प्रास्ताविक विनोद शिरसाट यांनी केले. श्री. सावे यांच्या हस्ते झेंडी दाखवून रॅली रवाना करण्यात आली. या रॅलीत मोटार सायकल, तीन चाकी रिक्षा, मालवाहू वाहने,हातगाडी, बसेस, कार अशा विविध ३५० हून अधिक ईलेक्ट्रिक वाहनांनी सहभाग घेतला. क्रांती चौकात रॅलीचा समारोप झाला.

COMMENTS