Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘समता’ स्कूलमध्ये ‘ऊर्जा 2.0’ मेगा स्पोर्ट उपक्रमाचा जल्लोष

कोपरगाव शहर : विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ऊर्जा 2.O’ या मेगा स्पोर्ट्स उपक्रमाचे आयोजन समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि   उद्योजक सम्राट वर्मा, हिमांशी सम्राट वर्मा, वैजनाथ लोणगावकर, मंगल लोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक प्रात्यक्षिकातून ऊर्जेचा जल्लोष अनुभवायला मिळाला.  प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ड्रोनच्या सहाय्याने समता इंटरनॅशनल स्कूलचा ध्वजाचे ध्वजारोहण आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली घोडेस्वारी व शिस्तबद्ध परेड कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. अचूक रचना, काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध पावले पाहून उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांनी केले. त्या म्हणाल्या की, समता इंटरनॅशनल स्कूल फक्त पुस्तकी अभ्यासक्रमासाठी मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारी तत्पर शिक्षण संस्था आहे. त्यामुळेच समता सीबीएसई अंतर्गत होणाऱ्या बोर्ड परीक्षेत तसेच राज्य,जिल्हा तालुका स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारात देखील झळकते. समताचे नवनवीन उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित असून समता विद्यार्थ्यांची ध्येय व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगतिले.  यानंतर मान्यवरांचा सत्कार व विविध क्रीडा तसेच सहशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिक्षणासोबत क्रीडा व शारीरिक विकासालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज असल्याचे सांगत एकूणच ‘ऊर्जा 2.O’ हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धांचा भाग न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारा आहे. शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला हा उपक्रम दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्राचार्य समीर अत्तार यांनी मानले. या वेळी समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, संचालक गिरीश सोनेकर, निरव रावलिया, अरविंद पटेल, संदीप कोयटे, अक्षरा पटेल, श्वेता अजमेरा, भरत अजमेरा, सिमरन खुबानी आदींसह पीआय संजय कोळी, न्यायाधीश युनूस तांबोळी,  न्यायाधीश सैफुद्दीन शेख, नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक विनोद राजपूत, डेप्युटी कमांडंट अमित कुमार आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

काळे’ शैक्षणिक संकुलात विविध कार्यक्रम उत्साहात
सुरेगाव गटाच्या अंगणवाडी सेविकाचा गोदाकाठ मध्ये सन्मान
संजीवनीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कोपरगाव शहर : विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ऊर्जा 2.O’ या मेगा स्पोर्ट्स उपक्रमाचे आयोजन समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि   उद्योजक सम्राट वर्मा, हिमांशी सम्राट वर्मा, वैजनाथ लोणगावकर, मंगल लोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक प्रात्यक्षिकातून ऊर्जेचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

 प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ड्रोनच्या सहाय्याने समता इंटरनॅशनल स्कूलचा ध्वजाचे ध्वजारोहण आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली घोडेस्वारी व शिस्तबद्ध परेड कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. अचूक रचना, काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध पावले पाहून उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांनी केले. त्या म्हणाल्या की, समता इंटरनॅशनल स्कूल फक्त पुस्तकी अभ्यासक्रमासाठी मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारी तत्पर शिक्षण संस्था आहे. त्यामुळेच समता सीबीएसई अंतर्गत होणाऱ्या बोर्ड परीक्षेत तसेच राज्य,जिल्हा तालुका स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारात देखील झळकते. समताचे नवनवीन उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित असून समता विद्यार्थ्यांची ध्येय व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगतिले.

 यानंतर मान्यवरांचा सत्कार व विविध क्रीडा तसेच सहशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिक्षणासोबत क्रीडा व शारीरिक विकासालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज असल्याचे सांगत एकूणच ‘ऊर्जा 2.O’ हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धांचा भाग न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारा आहे. शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला हा उपक्रम दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्राचार्य समीर अत्तार यांनी मानले. या वेळी समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, संचालक गिरीश सोनेकर, निरव रावलिया, अरविंद पटेल, संदीप कोयटे, अक्षरा पटेल, श्वेता अजमेरा, भरत अजमेरा, सिमरन खुबानी आदींसह पीआय संजय कोळी, न्यायाधीश युनूस तांबोळी,  न्यायाधीश सैफुद्दीन शेख, नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक विनोद राजपूत, डेप्युटी कमांडंट अमित कुमार आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS