Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरविकास खात्याने जनतेचा विश्‍वासघात केला

मंत्री गणेश नाईकांची थेट उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यावर टीकामुंबई ः नवी मुंबईतील नागरिकांच्या हक्काच्या भूखंडांबाबत राज्याचे मंत्री गणेश नाईक य

लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय
 मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तंद्री आम्ही उतरवणार – आ. गणेश नाईक
नवी मुंबईत महापौर-उपमहापौर बिनविरोध
ganesh naik

मंत्री गणेश नाईकांची थेट उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यावर टीका
मुंबई ः नवी मुंबईतील नागरिकांच्या हक्काच्या भूखंडांबाबत राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाशी येथे झालेल्या जनता दरबारात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर नवी मुंबईकरांसाठी कामच करता आले नाही तर मंत्रीपदाचा अर्थ काय? असे थेट प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागावर जोरदार टीका केली.
नागरिकांसाठी रुग्णालये, उद्याने, शाळा आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी भूखंडांची मागणी करण्यात आली होती. मात्र हे भूखंड जनतेला न देता बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेच्या हक्काची जमीन जनतेलाच मिळाली पाहिजे. माझी नाराजी दूर करायची असेल तर हे सर्व भूखंड परत द्या, असा इशाराही त्यांनी दिला. स्वतः मंत्रिमंडळाचा भाग असूनही संबंधित खात्याकडून योग्य निर्णय झाले नाहीत, याबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे. नगरविकास विभागाच्या निर्णयांमुळे नागरिकांच्या अपेक्षांना धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले. नाईक यांनी सिडको आणि महानगरपालिका प्रशासनालाही जबाबदार धरले. नागरिकांच्या विकासासाठी राखीव असलेले भूखंड अन्यत्र वळवले जाणे अयोग्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून जनहिताचे भूखंड जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने मंत्रीपद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला-मंत्रीपद म्हणजे मौन धारण करण्याचे स्थान नाही. जनतेच्या प्रश्‍नांवर स्पष्ट भूमिका घेणे हीच खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईच्या विकासासाठी आवश्यक जागा मिळवण्यात अपयश आले, तर त्या पदाला काही अर्थ उरत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

शिंदे-नाईक यांच्यातील संघर्ष तीव्र
महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली होती.त्यानंतर त्यांनी आत्ता नगरविकास खात्यावर टीका करताना त्यांनी हे कर्म दरिद्री काम आहे, असा शब्दप्रयोग केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नवी मुंबईतील विकासकामे, भूखंडांचे वाटप आणि बिल्डर लॉबीचा प्रभाव यावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे शिंदे-नाईक संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS