नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले असले तरी, मंगळवारी पुन्हा एकदा विरोधकांनी अदानी प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. त्यामुळे हिंडनबर्ग संस्थेचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्हे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांच्या संबंधांवरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. त्याचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवरही झाला आहे.

COMMENTS