पुणे ः मुंबईमध्ये वादळी पावसाने जोरदार हाहाकार माजवल्यानंतर कोसळलेल्या होर्डिंग्जने अनेकांचा जीव घेतल्यानंतर देखील राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट

पुणे ः मुंबईमध्ये वादळी पावसाने जोरदार हाहाकार माजवल्यानंतर कोसळलेल्या होर्डिंग्जने अनेकांचा जीव घेतल्यानंतर देखील राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कमी झालेले नाही. हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये वादळी वार्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वमोसमी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तर उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे शहरात देखील पुन्हा पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तविला आहे. मुंबईत पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी 50-60 किमी/तास वेगाने वार्याचा वेग येऊ शकतो. काही ठिकाणी जोरदार वार्यासह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मान्सून 19 मे रोजी अंदमानात येणार – यंदा लवकरच मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मोसमी वार्यांच्या आगमनाची वर्दी मिळाली असून, अंदमान-निकोबार बेट समुहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. रविवारपर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, लगत असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल. तसेच यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे.
वादळी वार्यासह पावसाचा आज अंदाज – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगील, सोलापूर, सातारा, बीड, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यातल्या तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटा, मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
COMMENTS