केडगाव येथून अल्पवयीन मुलांचे अज्ञाताकडून अपहरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव येथून अल्पवयीन मुलांचे अज्ञाताकडून अपहरण

अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव परिसरातील जुना अरणगाव रोड येथील दूधसागर सोसायटी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमीष दा

शीतल भागवतची अभियंतापदी निवड
दुःखमुक्तीसाठी समाजाला बुद्धांच्या विचारांची गरज ः प्रा. महेंद्र मिसाळ
कंत्राटी कर्मचारी एक हजाराची लाच घेतांना पकडला

अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव परिसरातील जुना अरणगाव रोड येथील दूधसागर सोसायटी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमीष दाखवून अपहरण केले. ही घटना रविवारी दिनांक 3 सकाळी दहा वाजताच्या सुमारास शिवशंभो रो-हौसिंग दूध सागर सोसायटी येथे घडली. शिवम भास्कर पुरी (वय 17 वर्षे 5 महिने)असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
शिवम संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा केडगाव परिसर व नगर येथील मित्रपरिवार तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भास्कर विठ्ठलबुवा पुरी (वय 49, राहणार शिवशंभो हासिंग, दूध सागर सोसायटी, जुना आरणगाव रोड, केडगाव, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 363 अन्वये अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार विश्‍वास गाजरे करीत आहे.

COMMENTS