Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीयमंत्री रामदास आठवले गुरुवारी नाशिक दौऱ्यावर

नाशिक प्रतिनिधी - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले गुरुवारी (दि. २०) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. दुपारी दोन वाजता एसएसके हॉटेल नाशिक येथे

बालरंगभूमी परिषद’ अहमदनगर शाखेचे कार्य उल्लेखनीय
महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाटयावर
मनपातील महाविकास आघाडीला बसणार झटका ; काँग्रेस आणणार मंगळवारी आसूड मोर्चा

नाशिक प्रतिनिधी – केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले गुरुवारी (दि. २०) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. दुपारी दोन वाजता एसएसके हॉटेल नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे. सायंकाळी चार वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे केंद्रीय मंत्री म्हणून ना. आठवले यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. यावेळी ख्यातनाम गायक राहुल शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री दादाजी भुसे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन. तसेच महायुतीचे पदाधिकारी. आमदार. खासदार. यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकाश लोंढे यांनी दिली. यावेळी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या नेत्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा यावेळी होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांनी केले.

COMMENTS