कोपरगाव तालुका ः येथील शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 9 वीतील मुलांनी आपल्या पॉकेट मनीमधून बचत करून मूकबधीर विद्यालयातील सर्व लहान मुला मुलींना स
कोपरगाव तालुका ः येथील शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 9 वीतील मुलांनी आपल्या पॉकेट मनीमधून बचत करून मूकबधीर विद्यालयातील सर्व लहान मुला मुलींना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भेट दिलेले गणवेश इतरांना प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे गौरउद्गार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी काढले. मूकबधिर विद्यालय, ब्राईट माईंड ग्लोबल स्कूल व पोद्दार जम्बु किड्स या विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष पाटील बोलत होते.
संस्थेचे चेअरमन अशोकराव रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी व सर्व ट्रस्ट मेंबर व स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुधीर डागा व स्कूल कमिटी मेंबर हे करत असलेल्या मुलांमुली करिताच्या कामाचे कौतुक केले यावेळी जवाहर शहा, डॉ. तुषार गलांडे, अॅड. मनोज कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक अनुप कातकडे, संस्थेचे सदस्य जवाहर शहा, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज कडू, सचिव डॉ. तुषार गलांडे, न्यूचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, ट्रेझर कैलास नागरी, ज्येष्ठ सदस्य तुलसीदास खुबानी, आर.टी.पटेल, दिलीपराव वाबळे, दुशिंग भाऊसाहेब, श्याम जंगम, अनिकेत भडकवाडे, मानस नागरे, पृथ्वी शिंदे, कैलास नागरे, संदीप राशीनकर, मोहन उकिरडे यांसह मुख्याध्यापक एकनाथ घोलवड, प्राचार्य श्रीमती नेहा पहाडे, प्रचार आरती बबं, रमेश टिकल सह सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण डुकरे यांनी केले. यावेळी उद्योजक अनुप कातकडे व गोदावरी बायोरीफायनरीज प्रा.लि साखरवाडी यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश बूट, सॉक्स व खाऊचे वाटप करण्यात आले.
COMMENTS