Homeताज्या बातम्यासंपादकीय

सेऊल दुर्घटनेचा बोध!

  मोकळा श्वास घेण्यासाठी उत्सव साजरा करणारे दक्षिण कोरियातील सेऊल येथील लाखोंच्या गर्दीतील दीडशे तरुणांनी केवळ ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमावल्याच

पवारांचे वक्तव्य, हरियाणातील घडामोडी समानार्थी !
राजकीय किंमत न चुकवण्याची खेळी !
सॅम पित्रोदा आणि विवाद ! 

  मोकळा श्वास घेण्यासाठी उत्सव साजरा करणारे दक्षिण कोरियातील सेऊल येथील लाखोंच्या गर्दीतील दीडशे तरुणांनी केवळ ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमावल्याची दुर्घटना रात्रीच झाली. कोरोना काळानंतर जगातल्या सर्वच देशांमध्ये मास्क घेऊन वावरणं ही सक्ती होती. मात्र मास्क पासून सुटका आणि त्यातच उत्सव साजरा करायला भेटणं, ही अप्रूप पर्वणी वाटणारे युवक सेऊल मधील त्या सभागृहात मोठ्या संख्येने गोळा झाले. जवळपास सव्वा लाख तरुण-तरुणी या ठिकाणी गोळा झाले. हॅलोवीन हा समारंभ ते त्या ठिकाणी साजरा करणार होते. अर्थात हॅलोवीन हा समारंभ एक प्रकारचा भीतीयुक्त असा सोहळा असतो; परंतु, तो उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, अशा प्रतिकात्मक भीतीच्या सोहळ्यामध्ये जवळपास दीडशे युवकांचे प्राण ज्यामध्ये ९७ तरुणी आणि ५४ युवकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ८० तरुण – तरुणी या दुर्घटनेत जखमी झालेल्या आहेत. अरुंद जागेत मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी, त्यातूनच तरुणांचा ओसंडणारा उत्साह आणि थ्रिलिंग असणारा हा समारोह यामध्ये उत्साहाच्या भरात अरुंद रस्त्यातून चालत राहिले आणि त्यातच ऑक्सिजनचाही अभाव निर्माण झाला. तरुणांचा जीव गुदमरायला लागला त्यातून काही प्रमाणात पळापळ झाली आणि यातच ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना इतकी प्रचंड मोठी आहे की, यामुळे दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी या दुर्घटनेला ‘राष्ट्रीय दुःख’ म्हणून घोषित केले. अग्निशमन अधिकारी आणि साक्षीदारांनी सांगितले की, लोक अरूंद गल्लीमध्ये भिंतीवर चढलेले असल्याने आधीच भरलेले असताना, जेव्हा उताराच्या दिशेने यायला लागले तेव्हा लोक गल्लीमध्ये अक्षरशः कोसळत राहिले आणि त्यांच्या खाली दबलेल्या लोकांवरून इतरांनी आपला रस्ता तयार केला. हे दृश्य पाहताना अतिशय भीषण होते. खरे तर या घटनेने पुन्हा एकदा ऑक्सिजनचे महत्त्वच मानवी जीवनात अधोरेखित केलेले आहे. अतिशय कमी जागेत अधिक संख्येने लोक जमा झाले तर त्यासाठी लागणारा ऑक्सिजन पुरेसा नसेल तर त्या ठिकाणी गुदमरून जाण्याची अवस्था निर्माण होते. तरुणांनी उत्साहाच्या भरात या बावीकडे दुर्लक्ष केलं. मास्क काढून ऑक्सिजन घेण्यासाठी उत्साहाने उत्सव साजरा करणारे तरुण अशा पद्धतीने मृत्यूला सामोरे जातील, असा कोणीही विचार केलेला नसेल! परंतु, वास्तव हे कल्पनेपेक्षाही भीषण असतं, याची पुन्हा एकदा या घटनेतून प्रचिती आल्याचेच दिसते. अर्थात या दुर्घटने विषयी कोणतेही निष्कर्ष काढणे चुकीचे असले तरी एकूणच दुर्घटना ही अति गर्दीमुळे झाल्याचे दिसते त्याला लोकांमध्ये उडालेली धांदल किंवा घाबरून पळापळ होणे किंवा ऑक्सिजन अभावाने गुदमरून जाणे यापैकी कुठल्या गोष्टींचा नक्की अधिक दुष्प्रभाव निर्माण झाला, हे तपासातूनच कळेल. परंतु झालेली घटना ही जगाचं लक्ष वेधून घेणारी आहे. अर्थात या उत्सवामध्ये जगभरातील अनेक देशांचे तरुणही या हॅलोवीन समारंभात  सामील झालेले होते. या दुर्घटनेतून जगभरातल्या तरुणांनी आणि एकूणच उत्सव प्रिय लोकांनी काही बोध घेणे निश्चितपणे गरजेचे आहे एखाद्या ठिकाणी गर्दी जमण्यापूर्वी त्या ठिकाणचा परिसर किती रुंद आहे त्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून किती लोकांसाठी हवा खेळती राहील किंवा ऑक्सिजन पुरेसा ठरेल, याचे आता शास्त्रीय निकष लावल्याशिवाय अशा कोणत्याही ठिकाणी अति संख्येने लोकांनी जमू नये; हा बोध या दुर्घटनेतून निश्चितपणे घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने ही दुर्घटना घडली ते पाहता जगभरात जे तरुण यात सामील झालेले होते, म्हणजे हा उत्सव किती लोकप्रिय असावा याची देखील साक्ष पटते. परंतु, अशा उत्सवांमध्ये सामील होण्यापूर्वी तरुणांनी आणि लोकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याचाही संदेश या दुर्घटनेतून निश्चितपणे जगभरातल्या लोकांनी घ्यावा, अशीच ही दुर्घटना आहे.

COMMENTS